राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा संजय थोरात यांची नागरिकांच्या विविध समस्यांविषयी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक...
मंचर प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा राबवला जात आहे. यानिमित्ताने आज चांडोली बुद्रुक या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी महावितरण कार्यालयाचे कर्मचारी, रेशन दुकानदार,महसूल विभागाचे कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या व अडचणी सोडवण्यात आल्या. या वेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा संजय थोरात, जिल्हा सरचिटणीस नवनाथ थोरात,युवा नेते गणेश थोरात,उत्तम राक्षे सर,साजिद सय्यद,कालिदास गांजाळे, गीताभाऊ गुरुजी,शिवाजी थोरात,प्रवीण फुटाणे,अक्षय थोरात,भरत काळे,सुभाष मावकर,दिनेश टेमगिरे,रामभाऊ थोरात,प्रवीण इंदोरे,शंकर काळे तुकाराम थोरात संतोष थोरात पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष संजयशेठ थोरात यांनी नागरिकांना काही समस्या असल्यास भाजप कार्यालय चांडोली बुद्रुक या ठिकाणी येऊन सांगाव्यात असे आव्हान केले तसेच नवनाथ थोरात यांनी सेवा पंधरवडा निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली. गणेश थोरात यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.