Skip to main content

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील पाय घसरून पडले, हाताला आणि पाठीला दुखापत

समर्थ भारत वृत्तसेवा



मंचर ता. २८ : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील काल संध्याकाळी आपल्या राहत्या घरातच पाय घसरून पडल्याने त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे! त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार केले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र गरज पडल्यास त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते असं म्हणत डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अजित पवार गटाने मोठी जबाबदारी सोपवली होती मात्र वळसे पाटील यांना विश्रांती घ्यावी लागणार असल्याने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे टेन्शन वाढले आहे. 

वीस वर्षांपूर्वी दिलीप वळसे पाटलांची साथ सोडत शिवसेनेत दाखल झालेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आ. दिलीप मोहिते, आ. अतुल बेनके, मा. आ. पोपटराव गावडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. याच पक्ष प्रवेशाच्या वेळी आढळराव पाटील यांच्या लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा देखील करण्यात आली होती. दरम्यान आढळराव पाटील यांना लोकसभेवर पाठविण्यासाठी वळसे पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती, मात्र आता वळसे पाटील यांना झालेल्या दुखापतीमुळे आढळराव पाटील आणि समर्थकांचे टेन्शन वाढले आहे.

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.