Skip to main content

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर,



आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला.

या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील
यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा
आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस आमरण उपोषणामुळे खालावत चालली आहे. याची चिंता राज्यातील कोट्यवधी मराठा समाजाला लागून राहिली आहे. 

त्यामुळे मराठा समाज आक्रमक होत ठीक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत आहे. 

शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करून मराठा
समाजाला न्याय द्यावा हीच या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षण विषय तात्काळ निकाली काढून जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्याची मागणी केली.
आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव का. पोलिस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त ठेवला होता.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.