Skip to main content

मोटारसायकलचा आणि चारचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी

समर्थ भारत वृत्तसेवा :



पारगाव लोणी रस्त्यावर मोटार आणि दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात (ता. आंबेगाव) दुचाकीवरील सुरेश महादू भोजने यांचा मृत्यू झाला असूण जयश्री भोजने या सदर अपघातात जखमी झाल्या आहेत. हा अपघात शनिवार (ता. ६) दुपारी एकच्या सुमारास घडला.

पारगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत पारगाव लोणी रस्त्यावर मोटार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक सुरेश महादु भोजणे (वय ५५ रा. जारकरवाडी भोजनदरा ता. आंबेगाव) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मागे बसलेली त्यांची पत्नी जयश्री भोजणे (वय ५०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत अजय सुरेश भोजने यांनी पारगाव पोलीस ठाण्यात खबर दिली असून वॅगनार चालक निलेश कैलास सुक्रे (रा. खडकवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) याच्यावर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. ६) १ च्या सुमारास पारगाव लोणी रोडवर सुरेश भोजने त्यांचे ताब्यातील दुचाकीवर (एम एच १४ डी व्हीं ९३७१) त्यांची पत्नी राजश्री भोजणे हिला घेऊन जाकरवाडी येथे येत असताना लोणी बाजुकडून येणाऱ्या वॅग्नर गाडीचे (एम एच १४ जे एक्स २८३७) चालक निलेश कैलास सूक्रे याने नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीचे बाजूने येत भोजणे यांच्या मोटरसायकलला धडक दिली.



या अपघातात सुरेश महादु भोजणे व जयश्री सुरेश भोजणे यांच्या डोक्याला, हातापायाला गंभीर जखमा झाल्याने अजय भोजने यांचे वडील सुरेश भोजणे हे मयत झाले आहेत; तर जयश्री भोजने या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान वॅगनार चालक अपघाताची खबर न देता व वैद्यकीय मदत न करता तसेच पोलीसाना माहीती न देता पळुन गेला असल्याचा आरोप भोजने कुटुंबीयांनी केला आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सांगडे पुढील तपास आहेत.




पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...