Skip to main content

शेतकऱ्याच्या गायीचा चक्क विमानाने प्रवास

समर्थ भारत वृत्तसेवा



शिक्रापूर (शेरखान शेख) ता. १६ : गेली काही दिवसांपासून बैलगाडा शर्यती सुरु झाल्यानंतर बैलांना लाखो रुपयांची किंमत मिळत असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत असताना आता पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क गुजरात मधून अडीच लाख रुपयांना गाय खरेदी करुन विमानाने आणली असल्याने या गायची पुणे जिल्ह्यात चर्चा रंगू लागली आहे.                

पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील रवींद्र शांताराम धुमाळ या शेतकऱ्याला गोरक्षणाची आवड असल्याने त्यांच्याकडे यापूर्वी अनेक गायी आहेत, त्यांना गोरक्षणाची आवड असल्याने अनेक ठिकाणच्या शेतकरी तसेच गोशाळेंशी त्यांचा चागला संपर्क आहे. नुकतेच गुजरात मधील एका इसमाकडे सुवर्ण गिर जातीची गाय असून सदर गाय एका वेळी पंधरा लिटर दुध देत असून हि गाय विक्रीसाठी असल्याची माहिती रवींद्र धुमाळ यांना मित्राकडून समजली. 

यावेळी मित्राने धुमाळ यांना गायीचे फोटो देखील पाठवले. फोटो पाहता क्षणीच धुमाळ यांना गाय आवडल्याने त्यांनी थेट गुजरात गाठले. गाय खरेदी करण्यासाठी त्यांनी गायीसाठी थेट अडीच लाख रुपये देऊ करत गाय विमानाने लोहगाव विमानतळ येथे आणून खाजगी वाहनाने गायला घरी आणली. ही गाय घरी येताच अनेकांनी गाय पाहण्यासाठी गर्दी केली तर त्यांनतर दुसऱ्याच दिवशी गायीने गोंडस वासराला जन्म दिला असून आता गायीच्या दुधातून धुमाळ यांना उत्पन्न देखील सुरु होणार आहे. मात्र सध्या शिरुर तालुक्यातील या शेतकऱ्याच्या गायीच्या खरेदीची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.