Skip to main content

30 ते 50 वयोगटात हृदयविकाराच्या समस्या वाढल्या : डॉ. राऊत

समर्थ भारत वृतसेवा (सुधाकर सैद) : 



बेल्हे यथे ील एक प्रथितयश उद्योजक सागर व डॉ. अजित लामखडे यांचे वडील अशोक उर्फ बबन शिवबा लामखडे यांच्या दशक्रिया विधीमध् मंगळवार द ये िनांक २८/११/२०२३ रोजी आध्यात्मिक प्रवचना ऐवजी समाजामध्ये विशेषत: तरुणांनी स्वतःच्या आरोग्यविषयक व हृदयासंबंधी काय काळजी घ्यावी यासंदर्भात नारायणगाव यथे ील हृदयविकार तज्ञ, सर्पतज्ञ व विषबाधा तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांचे व्याख्यान ठेवून एक वेगळा व स्तुत्य उपक्रम राबविण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना डॉ. राऊत यांनी हृदयविकार हा आजार होण्याअगोदर जाणवणारी लक्षणे व त्यानंतर घ्यावयाची काळजी यासंदर्भात विवेचन केले.

सध्याची बदलती जीवनशैली, नियमित व्यायामाचा अभाव, यांत्रिकीकरणामुळे शारीरिक कष्टाचा अभाव, आयटी क्षेत्रातील तरुणांना १२/१४ तास बसून करावे लागणारे काम, त्यामुळे येणारी स्लता, आहाराव थू िषयी औदासीन्य, परिपर्ण ू आहार न मिळणे, पर्यायाने येणारा मानसिक ताणतणाव, तरुणांमध वाढलेले गुटखा व दारू या व्यसनाचे प्रमाण, तसेच घरापासून दूर असलेल्या ग्रामीण महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व त्यांच्या गृपमध् सहजपणे उपलब्ध होणारी नशेची साधने व त्या विळख्यात गुरफटलेला विद्यार्थी व त्यांच्याकडे होणारे पालकांचे अक्षम्य दुर्लक्ष, तसेच तंबाखू मधील निकोटीन व गुटख्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व हृदयविकाराचा धोका बळावतो, यासाठी नियमित आरोग्य तपासणी व औषधोपचार यामुळे निरोगी आयुष्य शक्य आहे.

उत्तम शाकाहार हा निरोगी राहण्याचा उत्तम उपाय असून त्याचबरोबर दररोज ४५ मिनिटे चालणे, तसेच पोहणे, योगा, सुरेल संगीत किंवा भजन ऐकणे, एकमेकांच्या दुःखात सहभागी होणे, सामाजिक कार्यातील सहभाग वाढणे आणि ताणतणाव टाळला तर निश्चितपणे आपण हृदयविकारापासून दूर राहाल अन्यथा मृत् हे अं यू तिम सत्य असून ते टाळणे कोणाच्याही हातात नाही व्याख्यानाचा समारोप करताना डॉक्टर राऊत यांनी असे सांगितले की निसर्गाबरोबर जुळलेल्या जीवनशैलीचा वापर करून आपण व्यसनांपासून दूर राहाल तरच निरोगी राहाल आणि असे केले तरच माझ्या या व्याख्यानाचा उपयोग झाला असे मी समजेल.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.