Skip to main content

एसटी चालकांना गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी

समर्थ भारत वृत्त :



एसटी बस चालवत असताना फोनवर बोलणे अथवा हेडफोन घालून मोबाईलवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानूसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत. एसटी चालकांना गाडी चालवताना मोबाइल वापरण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. असा नवा नियम लागू करण्यात आला असून याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खुप मोठा वाटा आहे. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असतांना फोनवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, मोबाईलवरील व्हिडीओ पाहणे अशा चालक व प्रवाशांचाद्ष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते. याबदृल समाज माध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी
महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची प्रमादीय कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत.
काय आहे नियमावली :
१. रा.प. बस / वाहन चालवितांना चालकांनी भ्रमणध्वणीचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
२. रा.प. बस / वाहन चालवित असतांना चालकांनी आपला भ्रमणध्वणी वाहकाकडे देण्यात यावा.
३. विनावाहक फेरीवरील चालकांनी वाहन चालवितांना आपला भ्रमणध्वणी आपल्या बॅगमध्ये ठेवावा.
४. चालक वाहन चालवित असताना हेडफोन आणि Bluetooth इत्यादी उपकरणाचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
५. सदर सूचना ही भाडेतत्वावरील चालकांना देखील बंधनकारक राहील सबब विभागांनी आपल्या विभागाच्या अखत्यारीतील भाडेतत्वावरील वाहनपुरवठादार कंपनी यांना अवगत करावे.
६. चालकांनी स्टेअरिंगवर असताना भ्रमणध्वणीचा वापर करीत असल्याचे निदर्शनांस आल्यास अशा चालकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल
सर्व मार्गतपासणी पथकांनी, सुरक्षा आणि दक्षता खाते यांचे तपासणी पथकांनी आपल्या दैनंदिन तपासणी कामगिरीमध्ये रा. प बसचालक वाहन चालवित असतांना भ्रमणध्वनीवर बोलत असल्याचे, गाणे ऐकत असल्याचे, हेडफोन व Bluetooth इत्यादी उपकरणाचा वापर करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांचे अहवाल सादर करावेत.
८. विभागास अहवाल प्राप्त झाल्यानंतर नमुद चालकांवर तातडीने खातेनिहाय प्रमादीय कारवाई करण्यात यावी.
९. मार्गतपासणी पथकांनी व सुरक्षा व दक्षता खाते यांचे तपासणी पथकांनी बसची तपासणी करतांना चालकाने भ्रमणध्वनी वाहकाकडे दिला आहे किंवा काय ? याबाबत देखील तपासणी करावी.
१०. विभागांनी उपरोक्त सूचना देण्यासाठी सर्व आगारांमध्ये स्वंतत्र नोंद वही ठेवून सूचना मिळालेबाबत चालकांची स्वाक्षरी घेण्यात यावी. आगारांमध्ये सूचना फलकावर याबाबत चालकांसाठी सूचना प्रसारित करण्यात यावी.
११. सदर सूचनेबाबत प्रत्येक आगारात रबरी शिक्का तयार करुन वाहन परीक्षकामार्फत वाहन रोजनाम्यावर शिक्का मुद्रित करावा.




पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.