Skip to main content

शेतकऱ्यांना भेटणार आता 8 हजार रुपये

समर्थ भारत वृत्त:



केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२४ रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल. यात शेतकऱ्यांना दिला जाणारा सन्मान निधी दोन हजारांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे.

जाण्याची सध्या या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून ८ हजार केली जाऊ शकते.

सध्या सन्मान निधी वर्षभरात तीन हफ्त्यांमध्ये दिला जातो. दर चार महिन्यांनी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात. मोदी सरकारच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात या सन्मान निधीचा १५ वा हप्ता जमा केला होता. केंद्र सरकारची ही सर्वांत मोठी योजना आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू करण्यात आली. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीत वाढ केली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

११ कोटी कुटुंबांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे.

- २.६० लाख कोटी रुपयांचा निधी या योजनेतून आतापर्यंत वितरित करण्यात आला आहे.

लोकप्रिय अर्थसंकल्प मांडणार?

आगामी वर्षात देश लोकसभा निवडणुकांना सामोरा जात आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून मांडण्यात येणारा हा अर्थसंकल्प अंतरिम असेल. निवडणुकीनंतर निवडून आलेले सरकार उरलेल्या आर्थिक वर्षाचा लेखानुदान तयार करते.


- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांप्रमाणेच महिला, आदिवासी, आर्थिक दुर्बल घटक, उद्योगपती, कामगार आदी घटकांना काही ना काही देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळेच अंतरिम असला तरी या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा केल्या जातील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सन्मान निधी (कोटी रु.)

वर्ष निधी

२०१८-१९४३६,८१५

२०१९-२०४,८९८,८०६

२०२०-२१६, ६७१,८०१

२०२१-२२६,४३१,३८४

२०२२-२३५,६५४, ६२५



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील पाय घसरून पडले, हाताला आणि पाठीला दुखापत

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर ता. २८ : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील काल संध्याकाळी आपल्या राहत्या घरातच पाय घसरून पडल्याने त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे! त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार केले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र गरज पडल्यास त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते असं म्हणत डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अजित पवार गटाने मोठी जबाबदारी सोपवली होती मात्र वळसे पाटील यांना विश्रांती घ्यावी लागणार असल्याने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे टेन्शन वाढले आहे.  वीस वर्षांपूर्वी दिलीप वळसे पाटलांची साथ सोडत शिवसेनेत दाखल झालेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आ. दिलीप मोहिते, आ. अतुल बेनके, मा. आ. पोपटराव गावडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी...

बांधावरील झाडे का तोडली म्हणत २९ वर्षीय तरुणाला बेद्दम मारहाण

 समर्थ भारत वृत्तसेवा: घोडेगाव, जमिनीच्या वादाचा राग मनात धरून बांधावरील बाभळीची झाडे का तोडली म्हणत २९ वर्षीय तरुणाला बेद्दम मारहाण करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास फिर्यादी किरण रामदास गावडे वय २९ वर्ष, रा. साल, ता. आंबेगाव हे गावरवाडी येथील त्यांच्या जमिनीच्या बांधावरील असलेली बाभळीची तोडली असता आरोपी उत्तम दगडू फदाले हे फिर्यादी गावडे यांच्या सोबत वाद घालू लागले तू ह्या बाभळी का तोडल्या ह्या बाभळी माझ्या हद्दीतल्या आहेत.  त्यावेळी फिर्यादी सांगत होते कि मी माझ्या हद्दीतील बाभळी तोसल्या आहेत तुमच्या हद्दीतील बबली मी तोडल्या नाहीत तर आरोपी उत्तम दगडू फदाले यांनी फिर्यादीस मारहाण सुरु केली आणि आरोपी यांनी त्यांचा मुलगा अर्जुन उत्तम फदाले याला फोन करून बोलावून घेतले अर्जुन उत्तम फदाले याने शिविगाळ आणि दमदाटी करत जबर मारहाण सुरु केली, बाजूलाच पडलेली काठी घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मारून फिर्यादी यास दुखापत केली असून घोडेगाव पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घोडेगाव पोलिस करत आहेत.