Skip to main content

पाण्यासाठी महिलांना करावी लागते कसरत, चार दिवसांतून मिळतं आहे अर्धा पाणी

मंचर प्रतिनिधी:

आंबेगाव तालुक्यात अवसरी खुर्द आहे. येथे पावसाळ्याच्या दिवसात चार दिवसांतून अर्धा तास पाणी मिळते. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अवसरी येथील गावकऱ्यांना नियमित शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे म्हणून चार जलजीवन योजनांसाठी तब्बल 6 कोटी रुपयापेक्षा अधिक निधी खर्च होणार आहे. पण, त्यासाठी विहिरींना शाश्वत पाणी मिळावे म्हणून आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत खडकमळा- इंदोरेवाडी, वायाळमळा- कराळेवाडी या वस्तीवरील योजनांच्या विहिरी मोरदरा पाझर तलावाचा पायथ्याला व भोरवाडी योजनेची विहीर भोरमळ्यातील ओढ्यावर खोदली आहे. या विहिरींसाठी पाणी उजव्या कालव्यातून दिले जाते. पण, पावसाने ताण दिल्यामुळे मोरदरा पाझर तलाव आटला आहे. पाझर तलावाचे खोलीकरण व गाळ काढण्याच्या कामाला राज्य सरकारने निधी दिल्यास विहिरींना शाश्वत पाणी उपलब्ध होईल. याकामी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गावकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे, असे पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष भोर यांनी दिली.

गावाला बाराही महिने दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी घोड नदीवरून चार किलोमीटर अंतरावरून लोखंडी पाईपलाईनद्वारे पाणी योजना करणे गरजेचे होते, असे महिलांनी सांगितले

अवसरी खुर्द गावठाण व वाड्यावस्त्यावरील लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त आहे. घोड नदीवरून पाणी आणल्यानंतर येणारे दरमहिन्याला नळ योजनेचे वीजबिल फार मोठ्या प्रमाणात येत होते. ते बिल कोणत्या वस्तीने किती भरावे, याचा ताळमेळ लागला नसता. एवढे बिल भरणे शक्य नव्हते. त्यामुळे गावातील वाड्यावस्त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जलजीवनअंतर्गत नळ योजनांची कामे मंजूर झाली. सदर कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाऊस झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.