Skip to main content

आदर्शगाव भागडी येथे आजी आजोबा कृतज्ञता सोहळा संपन्न

 मंचर प्रतिनिधी:



आदर्श गाव भागडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे पाद्यपूजन करून त्यांच्याप्रती प्रेम, कृतज्ञता व आदर व्यक्त केला. या वेळी आजी- आजोबांनी विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू उंडे उपाध्यक्ष मंदाताई आदक व व्यवस्थापन सदस्यांनी  आजी-आजोबांना सन्मानित केले. या प्रसंगी त्याच्यासाठी गायन, नृत्य, वादन, संगीत खुर्ची, आदी स्पर्धांचे आयोजन केले होते.

दरम्यान, त्यांनी अभंग, ओव्या, लोकगीते, लग्नाची गाणी, कविता, उखाणे आदी सादर केले. त्याचप्रमाणे आपल्या शालेय जीवनातील आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. मुख्याध्यापक बाळासाहेब गिलबिले यांनी आजी-आजोबा दिनाचे महत्त्व व आपल्या जीवनातील त्यांचे स्थान याविषयी माहिती दिली. व आजी-आजोबांचे नातवांशी असलेले घट्ट नाते पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी असल्याने हा कार्यक्रम आयोजित आहे असे सांगीतले. 



या कार्यक्रमास पोपट आवडा गवारी (अध्यक्ष जे. ना-संघ),रामचंद्र शंकर आगळे, रामभाऊ भालेराव, केरू मारुती लोंढे (का पो-पाटील), नामदेव उंडे  (मा .सरपंच), पाटीलबुवा  उंडे, भाऊ कृष्णा उंडे, देवराम  थिटे, म्हातारबा थिटे ,बाबाजी थिटे  शिवराम महादु उंडे, शंकर गवारी बाबाजी उंडे, केरभाऊ उंडे,बबन सदाशिव उंडे रामदास  उंडे बबन आगळे,रामदास गवारी, रोहिदास, गवारी  बाबूराव उंडे, मनोहर आगळे, धोंडीभाऊ , रामभाऊ , विश्वनाथ आगळे, पोपट थिटे (संचालक भि. स. सा. का), नामदेव गुंड, दत्तू बारेकर, गोरक्ष उंडेपंढरीनाथ गवारी, वैभव उंडे, विष्णू उंडे, तसेच विजया पोपटराव  थिटे, जनाबाई रामचंद्र आगळे, रत्नाबाई पाटीलबुवा उंडे, रोहिनी विठ्ठल जाधव, आश्विनी राहुल उंड़े, झुंदरबाई बाबाजी उंडे, पुजा सुभाष मोहिते, लक्ष्मी विश्वनाथ आगळे, चंद्रभागा बबन आगळे, रखमाबाई जयसिंग उंडे,रेऊबाई प्रभाकर उंडे, सरुबाई थिटे, सुमन रामभाऊ भालेरावकविता दादाभाऊ उंडे, मंदा संदिप आदक या

कार्यक्रमासाठी आजी अजोबा पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . तसेच आजी अजोबा व नातवंडाचे स्नेह भोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला . सिद्धी रावळ यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले व नियोजन आशा वाळके व स्वाती शिंदे यांनी केले तर लालन गायकवाड यांनी आभार मानले.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.