Skip to main content

छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पाहिले सुवर्ण मंदिर शिवजन्म भूमीत : शरद सोनवणे

समर्थ भारत वृत्तसेवा

नारायणगाव ता. २९ : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ म्हणून ओळख असलेल्या शिवजन्मभूमीत (ता.जुन्नर) जगातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण मंदिर उभे राहणार असल्याची घोषणा माजी आमदार शरद सोनवणे यांनी केली आहे. त्यासाठी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोदरे (ता.जुन्नर) गावातील २५ एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. माजी आमदार शरद सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यात २९ तारखेला सर्वात मोठी घोषणा होणार असल्याचे होर्डिंग लावले होते. त्यामुळे सर्वात मोठी कोणती घोषणा होणार याकडे जुन्नरकरांचे लक्ष लागून राहिले होते.


छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण मंदिर निर्माण करताना प्राचीन पद्धतीचे भव्य दिव्य महाद्वार व तटबंदी बांधण्यात येणार आहे. महाराजांच्या जीवनावर आधारित सुसज्ज ग्रंथालय, शिवभक्तांसाठी भोजनालय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनावर आधारित चित्रफीत, लघुपट सभा मंडप, संग्रहालय, लेझर वॉटर शोसाठी ॲम्पी थिअटर, छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याचा मुलामा असलेले मंदिर व महाराजांची सुवर्णमूर्ती यासह अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

मंदिराची वैशिष्ट्ये

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मंदिराची उभारणी करताना गोदरे (ता.जुन्नर) गावाची निवड करण्यात आली असून अंदाजे एक लाख स्क्वेअर मीटर मध्ये मंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. मंदिराचे वातावरण अनुकूलित ठेवण्यासाठी भारतीय प्रजातीचे वृक्ष रचना व उद्यानाचे सुशोभीकरण, सिंहासनधारी सुवर्ण मंदिर ते महाद्वारापर्यंत जिवंत पाण्याचा प्रवाह, पाण्याच्या कारंज्यांसोबत मंदिराच्या मुख्य द्वारावर धावते अश्व पुतळे, मंदिर परिसराला भव्य तटबंदी, सुवर्ण मंदिर व महाराजांच्या पुतळ्याचे प्रेक्षणीय अवलोकन करण्याकरिता दालन, जगातील सर्वात उंच भगवा ध्वज व भारतीय मूर्तिकार जे.जे स्कूल ऑफ आर्टचे प्रा. पवार हे मूर्तीची निर्मिती करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मंदिराची निर्मिती करण्यासाठी श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली आहे. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष म्हणून माजी आमदार शरद सोनवणे  काम पाहणार असून ट्रस्टवर अठरा पगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन काम केले जाणार आहे. सुवर्ण मंदिराची निर्मिती राजकारण विरहित असून सर्वांना त्यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. जुन्नर तालुक्यातील विविध विकास कामांच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि बांधकाम समितीचे सभापती मंगलदास बांदल, मा.जि.प. सदस्य गुलाब पारखे, नेताजी डोके, सचिन वाळुंज आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार शरद सोनवणे यांनी केलेल्या चार मोठ्या घोषणा

• एक वर्षाच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा शंभर फूट उंचीचा पुतळा उभा करणार.

• छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याचा मुलामा असलेले सुवर्ण मंदिर निर्माण होणार.

• छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे सर्वात मोठा ८० मीटर उंचीच्या भगव्या ध्वजाची उभारणी.

• आळेफाटा येथे सर्व सोयींनी युक्त सर्वात मोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहणार.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.