Skip to main content

ज्या गावात एस.टी.जाते ती गावे विकसित झालेली आहेत.त्या मूळे एस.टी.सेवा अखंडपणे सुरू रहावी-शिवसेना पुणे जिल्हा संघटक ॲड.अविनाश रहाणे

मंचर प्रतिनिधी:



महाराष्ट्र राज्यातील ज्या गावात एस.टी.जाते ती गावे विकसित झालेली आहेत.त्या मूळे एस.टी.सेवा अखंडपणे सुरू रहावी यासाठी राज्य सरकारने शर्थीचे प्रयत्न करावेत असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्हा संघटक ॲड.अविनाश रहाणे यांनी केले आहे.

सद्यस्थितीत केन्द्र सरकार व राज्य सरकार सर्व सार्वजनिक उद्योग, सेवा व संस्थांचे खाजगीकरण करण्याचा धडाका लावला आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून आधीच चार कंपन्या निर्माण केल्या आहेत.आता या विज कंपन्या देखील एका अडाणी उद्योगपतीला विकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.हा डाव सर्वांनी मिळून हाणून पाडला पाहिजे.उर्जा विभाग उद्योगपती ने खरेदी केल्यास त्याच्या फायद्या साठी तो त्याला जास्त लाभ होण्यासाठी वाटेल त्या दराने वीज पुरवठा करील.अधिकारी, कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने भरती केले जाईल, त्यांना पेन्शन मिळणार नाही.यामुळे या खाजगीकरणाच्या धोरणाला कडाडून विरोध व्हायला हवा. 

राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या मुक्कामाच्या ठिकाणी मिळतील त्या प्रवाशांना घेऊन दिलेल्या वेळेत पोहचतात.महा मंडळ फायदा तोट्याचा विचार न करता केवळ जनतेच्या सेवेसाठी एस.टी.वहातुक करते.या उलट खाजगी वहातुकदार फक्त फायदा होतो तेथेच वहातुक करतात.प्रवासी कमी असतील, रस्ता खराब असेल तर खाजगी वहातुकदार प्रवासी घेणे टाळू शकतो.मात्र एस.टी.गाड्याचे तसे नाही.दुर्गम ठिकाणी जेथे दुरध्वनी सेवा देखील उपलब्ध नाही.त्या ठिकाणी एस.टी.पोहोचते. आंबेगाव तालुक्यात ९ वर्षांपूर्वी घडलेली भुस्कलनाची दुर्दैवी घटना केवळ मुक्कामी गेलेल्या एस.टी.मुळेच सर्वांना समजली व अनेकांचे जीव वाचले.ज्या गावापर्यंत एस.टी.जाते त्या गावांचा विकास झालेला आपल्याला पहायला मिळतो.म्हणून कुठल्याही परिस्थितीत एस.टी.चे खाजगीकरण होऊ न देता ही सरकारी सेवा सुरू रहायला हवी.ही सेवा सुरू असताना प्रवाशांना सवलतींची खैरात वाटल्याची जाहिरात करण्यात येत आहे.प्रत्यक्षात प्रवाशांना सवलतीं मिळत नाही आणि महामंडळ देखील फायद्यात दिसत नाही.एस.टी.फायद्यात आणायची असेल तर चालक आणि वाहक यांना प्रवाशा मागे इन्सेन्टीव्ह देण्यासारखे पर्याय शोधावे जेणेकरून प्रवाशांना सेवा ही मिळेल, कर्मचाऱ्यांना सेवा केल्याचे समाधान मिळेल आणि महामंडळ ही नफ्यात येईल.या सर्व गोष्टींचा विचार व्हावा.

महावितरण,एस.टी.वहातुक या बरोबरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याही तितक्याच महत्वाच्या आहेत. श्रीमंतांची मुले महागडी फी भरून खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकतात मात्र गोरगरिबांची, शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी कामगार यांच्या मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाय शिक्षणासाठी पर्याय नाही.अनेक दुर्गम भागात कमी विद्यार्थी संख्या असली तरी तिथे सक्तीने शिक्षक आपली जबाबदारी पार पाडत आहेत.तेच खाजगी संस्था ही सेवा कमी आर्थिक फायदा होईल म्हणून तेथे सेवा पुरवत नाहीत. एकंदर एस.टी. महामंडळ,विज वितरण कंपनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे खाजगीकरण होऊ न देता या सरकारी सेवा अखंडपणे सुरू राहिल्या पाहिजेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्हा संघटक ॲड.अविनाश रहाणे यांनी सांगितले.







पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.