प्रतिनिधी: विजय कानसकर, लाखणगाव
आंबेगाव तालुक्यातील देवगाव येथील गोविंद बाबुराव खांडगे यांच्या शेतात 16 ऑगस्ट 2023 रोजी(बुधवार) सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. गोविंद खांडगे यांचा मुलगा सागर खांडगे उसाला पाणी देण्यासाठी गेला असता त्याला बिबटया मृत अवस्थेत आढळून आला.
देवगाव शिवारात घोडनदी पाण्याचे क्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणात उसाचे पीक आहे.
सावली व थंड हवेमुळे वारंवार बिबट्याचे दर्शन घडत असते. त्यामुळे शेतकऱ्यात नेहमी भीतीचे वातावरण असते आपला जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांना आपल्या पिकांना रात्री व दिवसा पाणी द्यावे लागते. गणेश खांडगे यांना दोन वेळा बिबट्या दिसण्याची चर्चा असताना आज एक बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने पाहणाऱ्यांची गर्दी ऊसळली होती. बिबट्याची बातमी कळताच गावातील लोकांनी व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली.
चंद्रकांत खांडगे यांनी त्वरित वन विभागाला कळवल्याने वन विभाग कर्मचारी साईमला गिते, आणि रेस्कुटीम सभासद त्या ठिकाणी हजर झाले मात्र बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. शेतकरी बांधवांमध्ये भीतीच वातावरण पसरल आहे.
वनविभागाने पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थ यांनी केली आहे.