Skip to main content

पाचशे रुपयासाठी मुलानेच केला वडिलांवर केला विळ्याने वार

जुन्नर प्रतिनिधी:



वडिलांनी दारू पिण्यासाठी 500 रुपये दिले नाही म्हणून   मुलाने रागात शिवीगाळ दमदाटी करत वडिलांवर विळ्याने वार केल्याची  घटना समोर आली आहे.

जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे ही घटना घडली आहे. संजय चंद्रकांत ढोबळे रा. माणिकडोह, ता. जुन्नर याच्यावर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील चंद्रकांत ढोबळे वय 78 वर्ष यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत ढोबळे हे घरात एकटे असताना संजय याने त्यांना शिवीगाळ दमदाटी करीत 500 रुपयांची मागणी केली. दारु पिण्यास पैसे देणार नाही, असे त्यांनी सांगितल्याने संजयने विळाने त्यांच्यावर वार केले आणि तेथून पळून गेला. या घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस स्टेशन करत आहे.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

लाखणगाव तळीरामांचा मोर्चा श्री हनुमान मंदिराकडे

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव या ठिकाणी श्री हनुमान व विठ्ठल रुख्मिणी अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात दारूची पार्टी करून दारूच्या रिकाम्या पिशव्या मंदिरात टाकण्यात आल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाखणगाव गावामध्ये दारूबंदी असून ही दारू येते कु ठून असा सवाल आता ग्रामस्थ करत आहेत. गावातील हनुमान मंदिर व विठ्ठल  रुक्मिणी मंदिरात काही समाजकं टक मुद्दाम दारू पिऊन फु गे मंदिरातच ठेवून मंदिराचे पावित्र्य भंग करत असल्याचे निदर्शनास आले आहे.  असा प्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा शिरीष कुमार रोडे पाटील यांनी व्यक्त के ली आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असल्याने भाविक भक्ताची वर्दळ कमी असल्याचा फायदा घेऊन तळीराम मंदिरात मद्यपान करून रिकाम्या पिशव्या तिथेच टाकून निघून जातात.