Skip to main content

श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे यांच्या वतीने वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संचचे वाटप

घोडेगाव प्रतिनिधी:



पुण्यातील विविध ठिकाणांहून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेली काही तरुण मंडळी भक्तिमय विचारधारणेतून संघटित होऊन आपल्या "श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे" ही संस्था चालवत आहेत. समितीच्या वतीने गेली कित्येक वर्षे नियमित आषाढी पालखी वारी सोहळ्याकरीता भक्तिमय वसा जपत विविध समजोपायोगी उपक्रम राबविले जातात. 

याही वर्षी सदस्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विविध भागांतून पुण्यात आलेल्या कित्येक वारकरी दिंड्यांना समितीच्या वतीने अनुभवी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन "श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच" चे वाटप करण्यात आले. दिंड्यांच्या प्रमुख चालकांच्या हाती हे संच सुपूर्द केले गेले. वारी दरम्यान प्रथमोपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्वच बारीक सारीक गोष्टी अन् उपयुक्त औषधे या संचामधून उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. 

समितीच्या वतीने दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम राबवित नावलौकिक वाढविणाऱ्या सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे दिंडीतील सर्व वैष्णव भक्तगणांनी भरभरून कौतुक करून सर्वश्रींना भविष्यातील वाटचाली साठी आशीर्वाद दिले. यास प्रतिसाद म्हणून येणाऱ्या काळात असेच संघटित राहून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रयत्नशील राहण्याचा मानस असल्याचे समितीच्या प्रमुख सदस्यांनी नमूद केले.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...