Skip to main content

भीमाशंकरचे ऊस लागवड धोरण जाहीर

पारगाव प्रतिनिधी:



दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक, आ. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या निर्णयानुसार लागवड हंगाम २०२३-२४ मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी १ जूनपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली. 

कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार १ जून २०२३ पासून वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पुर्तता संबधित विभागीय गट कार्यालयात देऊन बेणे मागणी नोंदवावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसला येवून ऊस नोंद करावयाची आहे. त्यानंतर उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल.  

कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने / रोखीने राबविणेत येणाऱ्या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे, बायोकंपोष्ट / प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएस.आय.चे मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमिक अॅसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशक बी.व्ही.एम., ई.पी.एन. इ.चा पुरवठा, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, ऊस पिक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घेणेत यावा. ऊस पिक स्पर्धे अंतर्गत एकरी जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यानी आपली प्रवेश शुल्क फि रु.१००/- सप्टेंबर २०२३ अखेर भरुन नाव नोंदणी करावी.



ऊस लागवडीसाठी १ जून २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये को.८६०३२, को.व्हि.एस.आय.१८१२१, पिडीएन १५०१२, को.एम.११०८२ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. १ जून २०२३ ते ३० ऑक्टोबर २०२३ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम.०२६५ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. १ ऑगस्ट २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये व्हि.एस.आय.०८००५ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये एम.एस.१०००१, को.९०५७ या लवकर पक्व होणाऱ्या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. (बाळासाहेब बेंडे, चेअरमन)

 


             

ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचा प्रादुर्भाव टाळणेसाठी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे जून २०२३ अखेर खरेदी केले जाणार असून हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक कीडनियंत्रण करावे. या लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांची अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा. (प्रदीप वळसे, पाटील, व्हा. चेअरमन)


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...