Skip to main content

लोणी येथे पोलीस भरती झालेल्या अकरा युवक युवतींचा सत्कार

लोणी धामणी प्रतिनिधी: 


लोणी (ता. आंबेगाव) येथे नुकत्याच पोलीस भरती झालेल्या अकरा युवक युवतींचा येथील माजी विद्यार्थी विकास प्रबोधनी लोणी संचलित पोलीस अकॅडमीच्या वतीने आणि खेड विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील, पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे, गृह विभागाचे सहसचिव डॉ. कैलास गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लोणी येथे माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी संचलित पोलीस अकादमी लोणी व लोणी परिसरातील योग्य उत्तीर्ण पोलीस व सैन्य दलामध्ये संधी मिळावी म्हणून भरतीपूर्व सराव प्रशिक्षणासाठी सन 2020 पासून मैदानी  सराव व लेखी परीक्षा वर्ग चालू करण्यात आले होते. 2021- 22 मध्ये भरती प्रक्रिया बंद होती. चालू वर्षात 2023 मध्ये पोलीस विभागात भरती झालेल्या अकरा विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लोणी येथे आयोजीत केला होता. खेड विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील, पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे, गृह विभागाचे सहसचिव डॉ. कैलास गायकवाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रकाश शिंदे, दीपक साकोरे,स्वप्निल वाळुंज, दीपक वाळुंज,संकेत ढगे, अभिषेक चौधरी,राहुल शिंदे, मुलींमध्ये करिष्मा आदक, पल्लवी वाळुंज, ललिता किथे, स्वप्नाली शिंदे, हे तरुण-तरुणी भरती झालेले आहेत. यावेळी यांना मार्गदर्शन व मैदानी सराव करून घेणारे शिक्षक माजी सैनिक सोमनाथ कदम, माजी सैनिक गुलाब गायकवाड व लेखी परीक्षेसाठी सराव करून घेणारे राहुल पडवळ सर प्रसाद चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी किसन गायकवाड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रंगनाथ वाळुंज, प्रकाश वाळुंज  तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाळुंज, माजी सरपंच उद्धव लंके, कैलास गायकवाड, संतोष पडवळ, रोहिदास वाळुंज, प्राचार्य वेताळ सर, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक , चंद्रकांत गायकवाड, पोलीस पाटील संदीप आढाव व ग्रामस्थ हजर होते. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश वाळुंज यांनी प्रास्ताविक केले.  नवनीत शिनलकर यांनी आभार मानले.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

सहाय्यक फौजदाराची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या..

मंचर प्रतिनिधी: मंचर पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले एकनाथ ठकाजी वाजे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्याघटना केल्याची खळबळजनक बुधवार दिनांक .२५ मे २०२२ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत त्यांचे जावई आदित्य रवींद्र गभाले(वय.२५ वर्षे) रा.मुक्ताई नगर नारायणगाव,ता.जुन्नर,जि.पुणे यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की,फिर्यादी यांची पत्नी दिनांक.२३ मे २०२२ रोजी माहेरी चांडोली,ता.खेड येथे आई-वडिलांकडे गेल्या होत्या.दिनांक.२५ मे रोजी फिर्यादीची पत्नी सुप्रिया हिने तिचा पती यास फोन करून वडील एकनाथ वाजे यांनी शेजारी असणाऱ्या मोकळ्या १३ नंबर रूममध्ये स्वतःला कोंडून घेतले असून आम्ही बराच वेळ दरवाजा वाजूनही ते दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले.त्यानंतर कुटुंबियांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुटुंबियांनी रूमचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता एकनाथ वाजे यांनी बेडरूममधील हुकाला रस्सी बांधून गळफास घेतल्याचे दिसले.एकनाथ वाजे यांचा गळफास सोडून त्यांना खाली घेऊन ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून ते उप...

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...