Skip to main content

केंद्र शासनाच्या साखर व कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान: वळसे पाटील

कवठे येमाई प्रतिनिधी:


 शिरुर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक मलठण येथील राजयोग मंगल कार्यालय येथे शुक्रवार (दि.२६) रोजी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे संघटन मजबूत करण्याची आवाहन कार्यकर्त्यांना केले. यावेळी त्यांनी केंद्र शासनावर टीका करताना केंद्र शासनाच्या साखर व कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगितले.

 

जागतिक बाजारात साखरेला भाव असूनही यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळत नाही. केंद्राच्या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हीच परिस्थिती कांद्याची आहे. जगात कांद्याला मागणी असूनही केंद्र सरकार महागाईचे अपयश झाकण्यासाठी ठराविक वर्गाला खुश करण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा मिळू देत नाही व कांद्याची निर्यात करत नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात रामनवमीच्या मिरवणुका काढण्यात आल्या यामागील काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या काढल्या गेल्या नव्हत्या या मिरवणुकांना भारतीय जनता पक्षाच्या अंगच्या संघटनांनी आर्थिक मदत केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

  

इतिहास बदलण्याचे काम केले जात आहे. चुकीच्या पाणी वाटप धोरणाला विरोध करण्यासाठी उपोषण करण्याची तयारी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. यावेळी सर्वच बाजूंनी त्यांनी केंद्र  व राज्य सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी एकत्र राहिली तर आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी व त्यांच्या सहकारी चा विजय निश्चित असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.


याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदीप वळसे पाटील, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, सविता बगाटे, सरपंच दामूआण्णा घोडे, माजी पंचायत समिती सदस्य सुदाम ईचके, अरुणाताई घोडे आदी मान्यवर व मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...