Skip to main content

गावठी पिस्तूल बाळगणारा तरुण नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात.

समर्थ भारत वृत्तसेवा

नारायणगाव, ता. २: गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणास नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. पुणे-नाशिक महामार्गावरील कांदळी (ता.जुन्नर) हद्दीतील तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रा समोर खाकी रंगाच्या बुलेट मोटरसायकलीवर एक व्यक्ती गावठी बनावटीचा पिस्तूल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे  यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी कारवाई केली.

पोलीस नाईक मंगेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे यांच्या  पथकाने  दोन पंच यांना कला केंद्रा जवळ पाठवून आरोपी सागर अरुण चौगुले (वय २८ वर्षे) रा. शुक्रवार पेठ जुन्नर यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती केल्यानंतर त्याच्याकडून ३० हजार किमतीचे एक सिल्वर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्तूल,२० हजार किमतीची एम.एच.१४ के.के.२१४७ रॉयल इन्फिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल, व २ लाख तीस हजार किमतीचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पोपट मोहरे हे करीत आहेत.


 

 


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

शरद पवारांची मंचरमध्ये सभा, निकम समर्थकांमध्ये उत्साह

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर ता. ५ : सात महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या दिलीपराव वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत घरोबा केला होता. ही बाब शरद पवारांच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजप सोबत गेलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांची पोलखोल करण्याचे जाहीर केले होते. या पोलखोल मोहिमेची सुरुवात विद्यमान सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मतदारसंघातून करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र राज्यातील अनेक राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक घडामोडींमुळे या मोहिमेला ब्रेक लागला होता.  या पोल खोल मोहिमेमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा येवला मतदार संघ आणि धनंजय मुंडे यांच्या बीड मधील सभा वगळता अन्य ठिकाणी सभा झाल्या नव्हत्या. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा या मोहिमेला मंचर मधून सुरुवात करण्याचे ठरवले असून. मंचर मध्ये होणाऱ्या सभेत ते सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर...

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...