Skip to main content

क्रेनची चोरी करणारा अट्टल गुन्हेगार आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात.

समर्थ भारत वृत्तसेवा

आळेफाटा, ता. २८: आळेफाटा येथील नगर रोडवर असलेल्या   पसायदान कॉम्प्लेक्स या ठिकाणाहुन दि.९ रोजी रात्रीच्या सुमारास भिमाशंकर सखाराम आवटे यांच्या मालकीच्या त्यांनी पार्किंग करून ठेवलेले महिंद्रा बोलेरो कंपनीचे केन क्र. एमएच ०४ डीटी ०२८३ हे  कोणातरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना इतर चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास आळेफाटा पोलीसांनी अटक केली असून अट्टल गुन्हेगाराकडून १,४०,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

दाखल गुन्हयामध्ये क्रेन चोरीला गेल्याने तसेच आजुबाजुच्या परीसरातून चारचाकी वाहने चोरीला जात असल्याचे गांभीर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी पोलीस स्टेशनकडील स्टाफची पथके बनवुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर व त्यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन करून व गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळवुन त्यानुसार यातील अज्ञात आरोपींचा माग काढत राजु बाबुराव जावळकर (वय ५५ वर्षे, रा. रिध्दी सिध्दी अपार्टमेट, फ्लॅट नं. ४०३, डोणजेफाटा ता. हवेली जि. पुणे) यांस पुणे या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देवून सदरचे क्रेन हे अंगद पुनम यादव (सध्या रा. कळंबोली, मुंबई, मुळ रा. आझमगड, राज्य उत्तरप्रदेश) यांस विकले असल्याचे सांगितले आहे.  

आरोपीने गुन्हयात वापरलेले वाहन स्कॉपिओ वाहन क्र. एम. एच. १६/अ.जी. ४०४४ तसेच सदर गुन्हयातील क्रेन विकलेल्या पोटी आलेले ४०,०००/रूपये असा एकुण १,४०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत करून ती जप्त केली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, विनोद गायकवाड, नरेंद्र गायकवाडभिमा लोंढे, संजय शिंगाडे, पंकज पारखे, अमित  माळुंजे, नवीन अरगडे, हनुमंत ढोबळे, प्रशांत तांगडकर यांनी केली आहे.


  

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.