Skip to main content

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 97.81% मतदान.

समर्थ भारत वृत्तसेवा

मंचर, ता. २८ : संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली असून, तब्बल ९७.८१% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण चार मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानात सोसायटी आणि ग्रामपंचायत गटातील १५५८ मतदारांपैकी १५२४ मतदारांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी.एस.रोकडे यांनी दिली. 

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या मतदानानंतर शनिवारी सकाळी १०.३० वाजता मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरद चंद्र पवार सभागृहात प्रत्यक्ष मतमोजणी पार पडेल. माजी सभापती देवदत्त निकम यांना राष्ट्रवादी ने उमेदवारी नाकारल्यानंतर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आंबेगाव विधानसभा आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची दिशा, या बाजार समितीच्या निवडणुकीवर अवलंबून आहे.

चार केंद्रांवर झालेले मतदान

१) मंचर 

सोसायटी : २४६ पैकी २४३

ग्रामपंचायत : २५६ पैकी २५१

२) घोडेगाव

सोसायटी : ११८ पैकी ११७

ग्रामपंचायत : १६१ पैकी १५५ 

३) निरगुडसर

सोसायटी : २६५ पैकी २५३

ग्रामपंचायत : २१३ पैकी २०६

४) डिंभे

सोसायटी : ९२ पैकी ८८

ग्रामपंचायत : २०८ पैकी २०२ 

चौकट :

विरोधकांमुळे निरगुडसर हॉट केंद्र

माजी सभापती देवदत्त निकम यांच्या बंडाळीमुळे नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीचे वातावरण चांगले तापलेले पाहायला मिळाले. शुक्रवारी झालेल्या मतदानामध्ये आंबेगाव तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी निरगुडसर केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये माजी सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.  

वळसे पाटील यांच्या विरोधातील सर्वपक्षीयांचे मनोमिलन?

महाविकास आघाडीच्या विरोधात लढलेले माजी सभापती देवदत्त निकम आणि महायुतीच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांची मैफल केंद्राबाहेर जमली होती. त्यामुळे यापुढील राजकारण नेमके कुठल्या वळणावर जाते याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. सेना भाजपा आणि देवदत्त निकम यांच्या एकत्रित ताकदीचा विचार केल्यास, आगामी विधानसभा तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जड जाऊ शकते. मात्र मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालानंतरच आंबेगावच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होईल.


 

 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.