Skip to main content

बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न.

पारनेर : प्रतिनिधी

पुढील महिन्यात होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाच्या उद्धव ठाकरे यांचे विचार मानणाऱ्या शिवसैनिकाने उमेदवारीची मागणी केली तर त्याचा आम्ही विचार करू असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी पारनेर येथील आनंद लॉन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी आ. लंके हे बोलत होते. यावेळी अशोक सावंत, बाबाजी तरटे, सुदाम पवार, प्रशांत गायकवाड, गंगाराम बेलकर, शिवाजी बेलकर, अर्जुन भालेकर, नगराध्यक्ष विजय औटी, किसनराव रासकर,खंडू भुकन, डॉ. आबासाहेब खोडदे, रा. या. औटी, बा. ठ. झावरे, इंद्रभान गाडेकर, मारूती रेपाळे, नंदकुमार देशमुख यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना लंके म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत आपणास सर्व १८ जागा निवडून आणायच्या आहेत. इच्छुकांची संख्या मोठी आहे. तालुक्याच्या सर्व भागांमध्ये उमेदवारी द्यावी लागेल. मागील निवडणुकीत झालेल्या चुका दुरूस्त करून यावेळी त्या होणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल. शरद पवार, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे यांच्या परिवारातील आपण सदस्य आहोत. एकदिलाने निवडणूक लढवू व निवडणूकीत विजयश्री खेचून आणू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणूकीसाठी परस्पर अर्ज दाखल करू नका, जे कोणी परस्पर अर्ज दाखल करतील त्यांनी त्यांचा अर्ज ठेवायचा की काढायचा याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. पक्षाच्या प्रक्रियेतून दाखल करण्यात आलेला अर्जच अधिकृत समजला जाईल. प्रशांत गायकवाड, गंगाराम बेलकर, रा.या. औटी, बा. ठ.झावरे यांनी अर्ज भरण्यासंदर्भातील नियोजन करण्याची सुचनाही आ. लंके यांनी केली.

प्रसंगी मला विरोध करा, तुम्ही एकत्र रहा:-

राजकारणामुळे भावा-भावांमध्ये वाद करू नका. एकत्र रहा असा सल्ला देताना आ. लंके म्हणाले, एकवेळ मला विरोध करा मात्र तुमच्यातला वाद मिटवून घ्या. आपल्या राजकारणासाठी गावागावांत, घराघरात वाद लावायचा नाही. संघर्ष थांबला पाहिजे. दोघांमधील वादामुळे होणाऱ्या विभाजनाचा फायदा काही राजकारणी घेण्याचा प्रयत्न करतात.  त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊ देऊ नका असे ते म्हणाले.

त्यांची इच्छा असेल तर...

महाविकास आघाडीतील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षातील कोणाही इच्छुकास आपल्या मंडळाकडून निवडणूक लढवायची इच्छा असेल तर त्यांचा विचार करू. ज्यांचा तालुक्यातील वातावरण संघर्षशिल ठेवायचे आहे ते आपल्याकडे येणार नाहीत. ते त्यांचा निर्णय घेतील. आपण जिंकणारच आहोत. परंतू समोरच्याने दहा वेळा विचार केला पाहिजे की इतका फरक झाला कसा ? असेही लंके यांनी सांगितले.


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.