Skip to main content

आळेफाटा परिसरात एस. टी. स्टँडवर चोरी करणारी टोळी जेरबंद.

समर्थ भारत वृत्तसेवा

आळेफाटा, ता. ३०: आळेफाटा (ता. जुन्नर) येथे एस. टी. स्टॅडवर दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी छाया हरिश्चंद्र थोरात रा. कळंब ता. आंबेगाव जि. पुणे या बसमध्ये चढत असताना तेथे चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे पर्समध्ये ठेवलेले एकुण १००० हजार रूपये व ३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण १,५८,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेले बाबत आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून इतर गुन्ह्यांची देखील उकल घडवून आणण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनिय बातमी दारामार्फत माहिती मिळवून आरोपींचे मोबाईल नंबर प्राप्त करून मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून सदरचे आरोपी हे बिडकीन ता. पैठण जि. संभाजीनगर येथिल असल्याचे निष्पन्न झाल्याने; तात्काळ सदर ठिकाणी पोलीस पथक रवाना झाले. या गुन्हयातील आरोपी बबन आनंदा भोसले (वय २७ वर्षे) रा. बाजारतळ बिडकीन ता.पैठण जि. औरंगाबाद यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. 

चोरीचे सोने वितळवून लगड बनवली

बबन भोसलेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता; त्याने त्याची सारोळा कासार (ता. जि. अहमदनगर) येथील महिला साथीदाराच्या मदतीने हे गुन्हे केले असल्याचे सांगितल्याने तात्काळ अहमदनगर येथे टिम रवाना झाली आणि सदर महिला आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपी बबन आनंदा भोसले याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्याने सदरचे चोरलेल्या सोन्याचे दागिने वितळून त्याची लगड बनवून त्याचे राहत्या घरात लपवून ठेवली असल्याची कबुली दिल्याने आरोपीसह पोलीस पथक सदर ठिकाणी पंचासमक्ष जावून त्याच्या राहत्या घरातून एकुण १७ तोळे वजनाची आणि ८,५०,०००/- रुपये किंमतीची लगड जप्त करण्यात आली आहे.

बंटीला बबलीची सात गुन्ह्यांत साथ 

या दोघांनी यापूर्वी सुध्दा आळेफाटा परीसरात त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली असुन त्यांनी आळेफाटा परीसरात एकुण ७ गुन्हे केल्याचे निष्पण्ण झाले असुन त्यांनी गुन्ह्यात चोरी केलेले एकुण १७ तोळे सोने हे गुन्ह्याचे कामी हस्तगत करून जप्त करण्यात आलेले आहे. अटक आरोपीकडुन आळेफाटा पोलिस स्टेशन हद्दीतील सात गुन्हे उघडकीस आलेले  आहेत. सदरचे आरोपींकडुन एकुण ८,५०,००० /- रुपये किंमतीचे १७ तोळे सोन्याची लगड असा मुद्देमाल तपासाकामी जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पो. हवा, नरेंद्र गायकवाड, पो. हवा. विनोद गायकवाड, पो.ना पंकज पारखे, पो.कॉ आमित मालुंजे, पो.कॉ नविन अरगडे, पो.कॉ. हनुमंत ढोबळे, पो.कॉ प्रशांत तांगडकर, म.पो.कॉ. दिपाली फंटागरे यांनी केली आहे.


 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.