Skip to main content

शिक्रापूरातील व्यापाऱ्यांचा विद्युत वितरण अधिकाऱ्याला घेराव.

समर्थ भारत वृत्तसेवा

शिक्रापूर, ता. २७: शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौकातील रोहित्र नादुरुस्त झाल्याने मागील आठवड्यापासून वीज पुरवठा खंडित असल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी विद्युत वितरण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला घेराव घालत वीज पुरवठा सुरळीत करुन देण्याची मागणी करत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौकातील स्टेट बँक परिसरात वीज पुरवठा करणारे रोहित्र आठ दिवसांअसून जळलेले असल्याने परिसरात वीज नाही त्याचा परिणाम शालेय मुलांच्या अभ्यास व व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत आहे, वारंवार मागणी करुन देखील विद्युत वितरण विभाग रोहित्र दुरुस्त करत नसल्याने आज काही व्यापारी व ग्रामस्थांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढला, यावेळी ओंकार हिरवे, ऋषिकेश तकटे, रविराज शिंदे, कमलाकर कुलकर्णी, यशवंत टाकळकर, प्रवीण काळोखे, किशोर देवासी, विलास थिटे, किशोर झुंजारे, विकास ससाणे, गोरख कळमकर, राजेंद्र करंजे यांसह आदी उपस्थित होते, यावेळी व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आमचा वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करु असा इशारा दिला असून विद्युत वितरण विभागाने आमची दखल न घेतल्यास आम्ही कार्यालयासमोर बसून आंदोलन करणार असल्याचे यावेळी ओंकार हिरवे यांनी सांगितले.

सदर रोहित्र दहा वर्षात प्रथमच नादुरुस्त झालेले असून त्या बाबतचा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे, मात्र रोहित्र शिल्लक नसल्याने वेळ लागला असून लवकरात लवकर विद्युत रोहित्र बसवले जाईल  (अशोक पाटीलसहाय्यक अभियंता)


 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.