Skip to main content

कवठे येमाई येथील गावठी दारूभट्टी वर कारवाई; १ लाख ६० हजार रु. मुद्देमाल केला नष्ट.

समर्थ भारत वृत्तसेवा

कवठे येमाई, ता. २५ :  कवठे येमाई (ता.शिरूर) येथील घोडनदी किनार गांजेवाडी शिवारामधे गायरान जमीनीत असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टी शिरूर पोलिस स्टेशन अंकित टाकळी हाजी औट पोस्टच्या पोलिसांनी कारवाई करत हि भट्टी उध्वस्त केली आहे. 

मानवी आरोग्यास हानीकारक गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरीता बॅरलमध्ये कच्चे रसायन भिजत घालून त्याची दारू आणि त्याच ठिकाणी केमीकलयुक्त ताडी तयार करुन ग्राहकास विक्री करत असल्याने एका ईसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे १६ बॅरल मधील ३२०० लिटर कच्चे रसायन, प्लास्टिक चे कॅन, ग्लास तसेच ताडी असा मुद्देमाल जागेवरच पंचांसमक्ष नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस शिपाई दिपक पवार, विशाल पालवे यांच्या पथकाने केली.

शिरूरच्या बेट भागात अवैध धंद्यांना उधाण आले असून बहुतांशी घोडनदी, कुकडी नदी किनारी सुरू असलेल्या अशा सर्वच दारुभट्ट्यांवर कारवाई होणार का? याकडे बेट भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच कुकडी, घोड नदीच्या पलीकडील  हाकेच्या अंतरावर असलेल्या अहमदनगर जिल्हयाच्या हद्दीतून शिरूरच्या बेट भागासह शहरात हातभट्टी दारुचा महापूर येत आहे. या हातभट्टी वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे. 


 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

सहाय्यक फौजदाराची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या..

मंचर प्रतिनिधी: मंचर पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले एकनाथ ठकाजी वाजे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्याघटना केल्याची खळबळजनक बुधवार दिनांक .२५ मे २०२२ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत त्यांचे जावई आदित्य रवींद्र गभाले(वय.२५ वर्षे) रा.मुक्ताई नगर नारायणगाव,ता.जुन्नर,जि.पुणे यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की,फिर्यादी यांची पत्नी दिनांक.२३ मे २०२२ रोजी माहेरी चांडोली,ता.खेड येथे आई-वडिलांकडे गेल्या होत्या.दिनांक.२५ मे रोजी फिर्यादीची पत्नी सुप्रिया हिने तिचा पती यास फोन करून वडील एकनाथ वाजे यांनी शेजारी असणाऱ्या मोकळ्या १३ नंबर रूममध्ये स्वतःला कोंडून घेतले असून आम्ही बराच वेळ दरवाजा वाजूनही ते दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले.त्यानंतर कुटुंबियांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुटुंबियांनी रूमचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता एकनाथ वाजे यांनी बेडरूममधील हुकाला रस्सी बांधून गळफास घेतल्याचे दिसले.एकनाथ वाजे यांचा गळफास सोडून त्यांना खाली घेऊन ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून ते उप...

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...