Skip to main content

श्री दत्त मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न.

समर्थ भारत वृत्तसेवा

घोडेगाव, ता. ३०: कोटमदरा ता.आंबेगाव येथे,दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही, नयन मनोहर श्री दत्त मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात व भक्तीभावाने संपन्न झाला.

डोंगराच्या कुशीत वसलेल्या कोटमदऱ्याचा हा परिसर एक अभुतपुर्व नजरा आहे असे दर्शणासाठी आलेले भाविक सांगतात.            

यावेळी सकाळी सामुहिक संकल्प व गणेश पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री दत्त पादुका अभिषेक संपन्न झाला. यावेळी सर्व भाविक-भक्तांच्या उपस्थितीत महाअरती घेण्यात आली. त्यानंतर पद्माकर जोशी यांनी दत्तात्रयाच्या मंत्राचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थीतांचा व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश तेंडूलकर यांची भजन संपन्न झाले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन साई जनसेवा संस्था, श्री स्वामी सर्मथ परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.     

या ठिकाणी असलेल्या श्री स्वामीदत्त आबाल वृध्दाश्रमात चार अनाथ मुले आणि सहा वृद्ध महिला सध्या राहत असून; संस्थेचे अध्यक्ष रमेश नारायण गायकवाड यांचे वडील, नारायण गायकवाड यांनी दहा गुंठे जागा या श्री स्वामी दत्त आबाल वृध्दाश्रमासाठी व श्री दत्त मंदिरासाठी देणगी स्वरूपात दिली आहे. या आबाल वृद्धाश्रमातील बालक आणि वृद्धांसाठी सेंद्रिय शेती करून अन्न पिकवले जाते. येथे अन्नछत्राची उभारणी करण्यात आली असून ८०×३० चा संपुर्ण परिसर असुन ७०० ते ८०० लोकांची क्षमता असणारे सभागृह आहे. 

पुणे येथील राजेंद धस यांच्याकडुन श्री स्वामीदत्त आबाल वृद्धाश्रमास लाकडी तेलघाणा भेट देण्यात आला असुन त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. आदिवासी भागातील आत्यंत दुर्बल अशा कुटुंबात दिपावली साजरी व्हावी म्हणून संस्था दरवर्षी वाडी वस्तीवर जाऊन प्रत्येक कुटूंबाला कपडे, गृहउपयोगी वस्तु, खेळणी व फराळ वाटप तसेच अनेक शाळांना शालेय साहित्याचे करत असते. थंडीत बेघर व गोर-गरिब कुटुंबांना ब्लँकेट व चादरचे वाटप  केले जाते. असे नवनविन उपक्रम सातत्याने संस्था दरवर्षी राबवत असुन दानशुर व्यक्तीनी या समाजकार्यास सहकार्य करावे असे अवाहन नारायण गायकवाड यांनी केले आहे. 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.