Skip to main content

रुग्णसेवेतून मातृवंदना : वल्लभ शेळके बनले हजारो रुग्णांचे सेवक

 समर्थ भारत वृत्तसेवा



बेल्हे, ता. १८:   कै. हौसाबाई गंगाराम शेळके यांच्या स्मरणार्थ एस एम बी टी हॉस्पिटल, घोटी (नाशिक), बुधरानी हॉस्पिटल पुणे, समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बेल्हे (बांगरवाडी) व राजुरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी मोफत महाआरोग्य शिबिर, सर्वरोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे राजुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजन करण्यात आले होते.

ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी एस एम बी टी हॉस्पिटल घोटी (नाशिक) येथून १५ डॉक्टरांची तर बुधरानी हॉस्पिटल पुणे येथून ६ डॉक्टरांची टीम उपस्थित झालेली होती. या शिबिराचा राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटातील विविध गावातील रुग्णांनी व पंचक्रोशीतील जवळपास २२२९ रुग्णांनी लाभ घेतला. या महाआरोग्य शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये सहभागी रुग्णांना आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजना इत्यादी मध्ये समाविष्ट सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी पुढे पाठवण्यात आले आहे.

बुधरानी हॉस्पिटल पुणे मार्फत १३५३ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २११ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर २०० रुग्णांना डोळ्यांचे औषध देण्यात आले. डोळ्यांचा मोतीबिंदू, काचबिंदू, लासुर्वे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळा पडद्यावर वेल याप्रकारच्या विविध शस्रक्रिया करण्यात येणार असून त्यातील पहिल्या ३८ लोकांची बॅच शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे रवाना करण्यात आली.

एस एम बी टी हॉस्पिटल च्या वतीने हृदयरोग, कॅन्सर निदान व उपचार, स्त्रियांचे आजार, पोटाचे आजार व शस्त्रक्रिया, बालरोग विभाग, तोंडाचे व दातांचे आजार, त्वचेचे आजार, अस्थिरोग, संधिवात, मेंदू, किडनी, कान, नाक, घसा संबंधित आजार, मुळव्याध, भगंदर, फिशर, मधुमेह, लघवी व रक्त शर्करा तपासणी तसेच सर्व रोगनिदान उपचार व तपासणी या सर्व आजारासंबंधीच्या चाचण्या व शस्त्रक्रिया यांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये एकूण ८७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी एस एम बी टी हॉस्पिटल येथे पाठवण्यात येणार आहे. हाडांचे आजार असलेल्या १९ रुग्णांना, जनरल शस्त्रक्रियेसाठी १७ रुग्णांना, स्त्रियांचे आजारासंबंधी ८ रुग्णांना, त्वचेचे विकारासंबंधी १३ रुग्णांना शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी एस एम बी टी हॉस्पिटल घोटी येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती वल्लभ शेळके यांनी दिली. 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.