Skip to main content

वॉचमनच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पती-पत्नीच्या प्रतिकाराने चोरट्यांचा डाव फसला.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

नाशिक - पुणे महामार्गावरील पळसे शिवारातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी येथील वॉचमनच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वॉचमनच्या पत्नीने आरडाओरड केली असता चोरट्यांनी तेथून धूम ठोकली.

नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बसस्थानक परिसरात एका गाळ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी जवळच राहत असलेले व रात्रीच्या वेळी वॉचमन काम करणारे दिनकर कोंडाजी गायधनी (वय.५७ वर्ष) यांनी त्या तिघा जणांना हटकले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. तसेच त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या आवाजामुळे त्यांची पत्नीही गाढ झोपेतून जागी झाली. पतीला तीघे बेदम मारहाण करत असल्याचे बघून तिने आरडाओरडा करत प्रतिकार केला. डोळ्यात मिरचीची पूड टाकूनसुद्धा वॉचमन व त्याच्या पत्नीने चोरट्यांना एटीएममध्ये प्रवेश करू दिला नाही. त्यांना तीव्र विरोध केल्याने चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला. 

आजुबाजूचे लोक गोळा होतील या भीतीपोटी चोरट्यांनी जाताना त्यांच्या दिशेने दगडफेक केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरु केला. वॉचमन दिनकर गायधनी यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जबाबावरून अज्ञात मारेकरी चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.