Skip to main content

पत्नीला नाहक त्रास देत असल्याच्या कारणावरून नातवाने केला आजीचा खून.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

आंतरजातीय विवाह केल्यावरून आजी रजिया शेख ही सातत्याने माझ्या पत्नीला नाहक त्रास देत होती. तिचे चारित्र्य चांगले नसल्याचे सांगत विनाकारण ती पत्नीची बदनामी करीत होती, या रागातून रजिया शेख यांचा खून त्यांच्याच नातवाने केल्याची बाब उघड झाली आहे. शाहनवाज महेबूब शेख असे आजीचा खून करणाऱ्या त्या तरूणाचे नाव आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कमिशन एजंट म्हणून काम करणाऱ्या रजिया शेख या शनिवारपासून दिनांक २५ पासून बेपत्ता होत्या. घटनास्थळावरील परिस्थिती पाहून त्यांचा खून झाल्याची खात्री पोलिसांना झाली होती. ७२ वर्षीय महिलेचा खून कोणी का करेल, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी तिच्या नात्यातील लोकांकडे विचारपूस केली. त्यावेळी दोन दिवसांपूर्वी शाहनवाज व त्याची आजी रजिया यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला आणि त्याच्या ओळखीतील व्यक्तीमार्फत त्याला बोलावून घेतले. संशयित म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने आजीचा खून केल्याची कबुली दिली. सध्या शाहनवाज हा पोलिस कोठडीत आहे. खुनाची घटना समोर आल्यानंतर अवघ्या पाच तासांत शाहनवाजला पोलिसांनी पकडले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे, सदर बझार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, सहायक पोलिस निरीक्षक क्षीरसागर, पोलिस नाईक महेश शिंदे, तात्यासाहेब पाटील, राजु मुदगल, कुमार शेळके यांच्या पथकाने केली.

शाहनवाज शेख याची आजी रजिया शेख या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात बॉण्ड रायटर (कमिशन एजंट) म्हणून मागील अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत होत्या. त्या ज्याठिकाणी बसतात, तेथे खड्डा झाला होता. शनिवारी (ता. २५) काम संपल्यानंतर आजी तेथील दर्ग्याजवळ येणार असल्याची त्याला माहिती होती. त्यामुळे तो तेथेच थांबून होता. आजी आल्यानंतर रात्रीची वेळ झाली होती, परिसरात शांतता होती. हा डाव साधून त्याने खड्डा बुजवायला तेथील परिसरातून माती आणू म्हणून पडीक इमारतीत नेले. त्याठिकाणी त्याने आजीच्या डोक्यात कौलारू घातले आणि पोटात स्क्रू-ड्रायव्हर भोकसून खून केला.



 


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...