Skip to main content

युवकांसाठी रविवार हा ठरला घातवार; मैत्रीचा धक्कादायक शेवट!

 मर्थ भारत न्यूज नेटवर्क:

अमरावतीमध्ये मैत्रीचा धक्कादायक शेवट झाल्याचं समोर आलं आहे. इथे दोन मित्रांचा एकत्रच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

नांदगाव पेठ धरणावर मौजमजा करण्यासाठी आलेल्या युवकांसाठी रविवार हा घातवार ठरला. धरणात पोहण्यासाठी गेलेला युवक बुडत असल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या युवकाने धरणात उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी येथील वाळकी धरणात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विनय शिवदास चव्हाण, (वय २० वर्षे), अभिषेक प्रदीप कुरळकर, (वय २१ वर्षे) असे घटनेत मृत्यमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. अमरावती आणि रहाटगाव येथील काही युवक धरणावर मौजमजा करण्यासाठी आलेले असतांना त्यातील अभिषेक प्रदीप कुरळकर रा. रहाटगाव हा पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला हे पाहून त्याठिकाणी असलेल्या विनय शिवदास चव्हाण रा. निशिगंधा कॉलनी अमरावती याने क्षणाचाही विचार न करता अभिषेकला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण दोघांचाही पाण्यात बुडून करूण अंत झाला.

घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आपत्ती व्यवस्थापनाला पाचारण केले. आपत्ती व्यवस्थापन चमू देखील त्याठिकाणी दाखल झाली. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दोन्ही मृतदेह काढण्यात आपत्ती व्यवस्थापन चमूला यश मिळाले. दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय इथे पाठविण्यात आले. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण काळे यांचेसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर होते. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

वर्षभरातील ही दुसरी घटना असून आजवर चार युवकांनी याठिकाणी आपले प्राण गमावले आहे. विभागाने धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केलेली नसून दररोज याठिकाणी असंख्य तरुण तरुणी फिरायला येत असतात.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.