Skip to main content

मुलानं पाणी भरलं नाही, म्हणून संतापलेल्या बापानं मुलाचा घेतला जीव.

नागपूर प्रतिनिधी:

बापानं पोराची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानं नागपूर हादरलंय. नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सुरादेवी झोपडपट्टीमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. गुलशन उर्फ गोलू असं १० वर्षांच्या मृत मुलाचं नाव आहे. गोलूच्या वडिलांनी कुत्र्यांच्या गळ्यातील पट्ट्यानं १० वर्षांच्या गोलूची गळा आवळून त्याचा जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली होती. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर बापानं गुन्ह्याची कबुलीदेखील दिली आहे. संतलाल मडावी असं मुलाची हत्या करण्यात आलेल्या आरोपी पित्याचं नाव आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातून संताप व्यक्त केला जातोय.

मुलाला गळा कुत्र्याच्या पट्ट्यानं घोटण्याआधी नराधम बापानं आपल्या १० वर्षांच्या मुलाला जबर मारहाण केली होती. दारु पिऊन नशेत असलेल्या या बापानं आपल्या मुलाला पाणी भरण्यास सांगितलं होतं. मुलानं पाणी भरलं नाही, म्हणून संतापलेल्या बापानं आपल्याच मुलाचा जीव घेतलाय.

छोट्या छोट्या कारणावरुन नशेत असलेल्या बाप आपल्या मुलाचा सतत मारहाण करत असल्याचं आरोप स्थानिकांनी केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. एका महिला नातेवाईकाची नजर या मुलावर पडली होती. त्यानंतर शेजारच्यांच्या मदतीनं पोलिसांत याप्रकरणी कळवण्यात आलं. त्यानंतर हत्येचा उलगडा झाला.



 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.