Skip to main content

अधिका-यांनी कामावर लक्ष ठेवून जनतेला न्याय द्यावा –गृहमंत्री वळसे पाटील

घोडेगाव प्रतिनिधी:

आंबेगाव तालुक्यामध्ये खते बी-बियाणे यांचा तुटवडा होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोट्यावधींची कामे सुरू आहेत ही कामे दर्जेदार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून लक्ष देऊन काम करून घ्यावी अशा सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या. घोडेगाव येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित सर्व खात्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, विदयुत विभाग, कृषी विभाग, पोलीस प्रशासन, कुकडी प्रकल्प, तालुका कृषी विभाग आदि विविध विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. यावेळी प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, विदयुत विभाग उपकार्यकारी अधिकारी शैलेश गिते, तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्षन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, लहु थाटे, भिमाशंकर कारखाना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी समाजकल्याण सभापती सुभाषराव मोरमारे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, कैलासबुवा काळे, जयसिंगराव काळे, शरद बॅंक संचालक सुदामराव काळे, रूपाली झोडगे, सरपंच क्रांती गाढवे आदि अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोटयावधी रूपयांची विकास कामे चालू आहे. परंतु संबंधित कामे चांगल्या पध्दतीने होत नाही. याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या तरी संबंधितांवर कारवाई आपल्या विभागाकडून होत नाही. त्यामुळे संबंधित चालू असलेल्या कामांचा दर्जा सुधारला नाही तर मी स्वतः तक्रार करेल, असा इशाराही वळसे-पाटील यांनी दिला.दुष्काळग्रस्त भागामध्ये चालू असलेल्या पाण्याचे टॅंकर, रोजगार हमी योजनेबाबतची माहिती, दरड प्रणव क्षेत्रातील गावे, वाडया वस्त्यांचे पुनर्वसन, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाई, संजय गांधी योजना, महास्वराज अभियान पेसा अंतर्गत गावांसाठी शिबिरे आदिंची माहिती यावेळी प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, तहसिलदार रमा जोशी यांनी दिली.

पंचायत समिती अंतर्गत नविन विहीर, राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन, छोटे पाटबंधारे, घरकुल, ग्रामपंचायत पाणीपुरवठा, दिव्यांग कल्याण निधी, शरद ग्रामविकास योजना, जलजिवन मिशन, पशुवैदयकीय दवाखाने, पशुधन, खते, बि-बियाणे आदिंबाबतची माहिती गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी दिली.विदयुत विभागाने गंजलेले खराब पोल बदलावे.घोडेगाव येथील हरिश्चंद्र महादेव मंदिर संस्थानचा वर्गासाठी प्रस्ताव दयावा, सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त भागात तातडीने पाणी पुरवठा करण्यासाठी पंचायत समिती व तहसील कार्यालय ताबडतोब निर्णय घ्यावा. यासाठी शासन स्तरावर सर्व प्रकारची मदत केली जाईल.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...