Skip to main content

बोरघर ग्रामस्थांतर्फे सत्कार समारंभ.

प्रतिनिधी:तुकाराम भांगले 

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील बोरघर या गावामध्ये सुमारे ६५० नोकरदार  व व्यावसायिक वर्गाने एकत्र मिळून काळभैरवनाथ ग्रामविकास संघ व बोरघर ग्रामस्थांतर्फे गावचे नाव उज्वल करणाऱ्या सामाजिक राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे अधिकारी, डॉक्टर, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारीव विद्यार्थी यांचा मानपत्र देऊन गौरविण्यात आले .त्याचबरोबर बोरघर गावात वाचनायल व बचत गट कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी बळवंतराव गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन झाले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दिलीप बांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राहुल जोशी,डॉ संतोष सुपे,डॉ प्रमिला बांबळे ,संजय शेळके उपसभापती कृषि उत्पन्न बाजार समिती,सरपंच सीताबाई बांबळे,किसनराव खामकर,राजू नंदकर उपजिल्हाधिकारी मुंबई,राजू घोडे,ग्रामसेवक जितेंद्र वाकडे,उपसरपंच दादू उंडे   हे उपस्थित होते

यावेळी गावातील नोकरदार,पेन्शनर,व्यावसायिक यांच्या प्रयत्नातून गोरगरीब,वाडीवस्तीतील रुग्णांसाठी  एकमताने गावासाठी रुग्णवाहिका लवकरच गावात कार्यरत करू असे काळभैरवनाथ ग्रामविकास संघाचे अध्यक्ष राजू वाळकोली यांनी सांगितले  कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जंगले यांनी केले तर सूत्रसंचालन राजू नंदकर यांनी केले क बोरघर ग्रामस्थांनी सण  २०२०-२०२१ आणि सन २०२१-२०२२ या कालावधीत उत्कृष्ट काम करून आपल्या बोरघर गावचे नाव राज्य आणि देश पातळीवर झळकावले आशा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

१.डॉ.दिलीप विठ्ठल बांबळे (मा.सर्वोच्च न्यायालय येथे अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना न्याय मिळणेसाठी याचिका दाखल केली तिची दखल विधानसभा अधिवेशनात घेण्यात आली)

२.श्री.संदीप चंद्रकांत पोटे ( बँक ऑफ महाराष्ट्र च्या सहाय्यक महाप्रबंधक या पदावर पदोन्नतीने निवड झाली आहे.)

३.डॉ.धीरज गोविंदराव जंगले( कोव्हीड काळात कामकाज आणि रुग्णांना आधार दिला)

४.डॉ.प्रदीप प्रकाश दगडे (कोव्हीड काळात कामकाज आणि रुग्णांना आधार दिला)

५.डॉ. हरीश किसन खामकर(सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम,राजकीय क्षेत्रात मजबूत पकड,कोव्हीड काळात काम आणि रुग्णांना आधार दिला)

५. रवींद्र सूर्याजी बांबळे ( पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती)

६.रमेश सिताराम घोडे  (  पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती)

७. वर्षा रमेश घोडे( उत्पादन शुल्क विभागात  आधिकारी पदावर महाराष्ट्र राज्य सेवा परिक्षेतुन निवड)

८. डॉ. सरिता दत्तात्रय बांबळे ( कोवीड काळामध्ये चांगले काम केल्याबद्दल माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले)



 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.