Skip to main content

मोबाईल दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस केले जेरबंद.

पुणे प्रतिनिधी:तुकाराम भांगले 

वरिष्ठांच्या आदेशानुसार दिनांक २५ एप्रिल २०२२ रोजी युनिट ५ गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली युनिटकडील सहा पोलीस निरीक्षक पी . एम . लोणारे व युनिटकडील अंमलदार , यांचेसह युनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना बातमी मिळाली की पुणे - सासवड रोडवर फुरसुंगी ओव्हर ब्रिजखाली फुरसुंगी , पुणे याठिकाणी काही संशयित इसम ते त्यांचेकडील घातक हत्यारे जवळ बाळगुन थांबलेले आहेत व ते फुरसुंगी येथील एका मोबाईल दुकानातील मोबाईल कॅश व इतर ऐवज लुटण्यासाठी जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली , त्याप्रमाणे युनिटकडील सपोनि प्रसाद लोणारे व त्यांचे टिमने पुणे सासवड रोड ओव्हर ब्रीजजवळ सापळा लावुन एकुण ५ इसम पळुन जात असतांना ताब्यात घेतले . सदर इसमांची नावे शिवराज उर्फ सुरज अर्जुन वाडेकर (वय २४ वर्षे ) रा. पवारवस्ती केशवनगर ,मुंढवा , पुणे ,संतोष राजु गायकवाड (वय .२६ वर्षे) रा. गायरानवस्ती , केशवनगर,  मुंढवा , पुणे दत्ता गणेश गायकवाड (वय.३४ वर्षे) रा. पवारवस्ती , केशवनगर, मुंढवा , पुणे ,अविनाश उर्फ चार्ली सिद्राम जाधव (वय.२९ वर्षे) रा.पवारवस्ती, केशवनगर मुंढवा ,पुणे  लखन सुभाष जाधव , (वय.३० वर्षे), रा. सर्वोदय कॉलनी , केशवनगर ,मुंढवा पुणे असे असुन आरोपी शिवराज उर्फ सुरज अर्जुन वाडेकर याचेवर एकुण ७ गुन्हे ,संतोष राजु गायकवाड याचेवर एकुण ९ गुन्हे दत्ता गणेश गायकवाड याचेवर एकुण २ गुन्हे, अविनाश उर्फ चार्ली सिद्राम जाधव याचेवर एकुण ०४ गुन्हे व सध्या तडीपार लखन सुभाष जाधव याचेवर एकुण ०६ गुन्हे असे वेग - वेगळ्या पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत . सदर इसमांकडुन एकुण २२,४६० / - रुपये किचा मुद्देमाल त्यामध्ये दोन कोयते , एक कटावणी , दोन स्क्रु- ड्रायव्हर , दोन बॅग , लाल मिरची पावडर , नायलॉनची दोरी असे घातक शस्त्रे व इतर वस्तु साधने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे .

यातील प्रत्येक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन प्रत्येकावर चोरी , जबरी चोरी , मारामारी असे गुन्हे दाखल आहेत व आरोपी नामे अविनाश उर्फ चार्ली सिद्राम जाधव , वय २९ हा सध्या तडीपार आहे . सदर आरोपी यांचेविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी मंजुर झालेली आहे . पुढील तपास युनिट कडील सपोनि प्रसाद लोणारे हे करीत आहेत . सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक ,अपर पोलीस आयुक्त , गुन्हे ,रामनाथ पोकळे , पोलीस उप - आयुक्त श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील , सहा . पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे , पोलीस अमंलदार , रमेश साबळे , दया शेगर , अजय गायकवाड , चेतन चव्हाण , दिपक लांडगे , अश्रुबा मोराळे , दत्तात्रय ठोंबरे यांनी केलेली आहे.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.