Skip to main content

वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

जुन्या दिवाणी दाव्यात वकील म्हणून काम करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून चाळीसगाव न्यायालयात वकील संघाच्या दालनासमोरील व्हरांड्यातच करजगाव (ता. चाळीसगाव) येथील एकाने वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच इतर वकील तत्काळ धावल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, हा प्रकार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी शहर पोलिसांत त्याच्याविरोधात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत येथील अ‍ॅड. सतीश खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की करजगाव येथील किसन मोतीराम सांगळे यांनी त्यांच्या शेतजमिनीच्या दिवाणी वादाबाबत २०१० ते २०१३ दरम्यान चाळीसगाव न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांच्यातर्फे अ‍ॅड. खैरनार काम पाहात होते.

या बाबत सविस्तर माहिती अशी की,खटल्यात सांगळे यांच्या बाजूने मनाई हुकूम पारीत करून दिला होता. त्यानंतर सांगळे यांच्या दुसऱ्या जमिनीबाबत असलेल्या दिवाणी दाव्यात ते सहकार्य करीत नसल्याने अ‍ॅड. खैरनार यांनी दुसरा वकील नेमावा, असे किसन सांगळे यांना सांगितले होते. दोन्ही दाव्यांचा निकाल सांगळे यांच्या बाजूने लागला होता. त्यानंतर जळगाव दिवाणी न्यायालयातील दाव्याचा निकाल मात्र सांगळे यांच्याविरोधात लागला. हे दावे अ‍ॅड. खैरनार यांनी लढवलेले नसताना सांगळे यांनी खैरनार व इतर तीन वकिलांविरोधात बार असोसिएशनकडे तक्रार केली होती. अशातच अ‍ॅड. एस. टी. खैरनार मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वकील संघाबाहेरील ओट्यावर मुलगा अ‍ॅड. उदय खैरनार यांच्याशी कोर्ट कामकाजाबाबत चर्चा करीत होते.

त्याचवेळी संशयित किसन सांगळे अ‍ॅड. खैरनार यांच्याजवळ आला व त्यांनी पिशवीतून पेट्रोलने भरलेली बाटली काढली आणि ती अ‍ॅड. सतीश खैरनार यांच्या तोंडावर फेकत अंगावर ओतली. अचानक घडलेल्या या प्रकाराने अ‍ॅड. खैरनार घाबरले. किसन सांगळेने आगपेटी पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न करीत असताना, इतर वकिलांनी सांगळेच्या हाताला झटका दिला. ज्यामुळे आगपेटी व काडी खाली पडली व अनर्थ टळला. सांगळे यांनी अ‍ॅड. खैरनार यांना ठार मारण्याचीही धमकी दिली. या फिर्यादीवरून संशयित किसन सांगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकाराचा वकील संघाने निषेध केला.



 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.