Skip to main content

निर्बंधमुक्त वातावरणामुळे गावगाडय़ाच्या अर्थचक्राला गती; कुस्त्यांचे आखाडे, तमाशांसह भरगच्च कार्यक्रम

पुणे प्रतिनिधी :

दोन वर्षांहून अधिक काळ करोनाच्या विळख्यात गेल्यानंतर गुढीपाडव्यापासून निर्बंधमुक्त वातावरणामुळे सर्वानीच मोकळा श्वास सोडला. त्याचाच एक भाग म्हणजे गेल्या काही दिवसांपासून गावोगावच्या यात्रांमुळे जिकडेतिकडे उत्सवी वातावरण दिसू लागले आहे. बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचे आखाडे, लोकनाटय़ तमाशांसह भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होऊ लागली आहे. त्यामुळे गावगाडय़ाच्या अर्थचक्राला एकप्रकारे गती प्राप्त झाली आहे. पै-पाहुण्यांना निमंत्रणे, विविध रूचकर पदार्थाचा समावेश असणाऱ्या जेवणावळी, देवपूजा, देवदर्शन, पालखी सोहळा, गावातील एकूणच उत्सवी वातावरण अशा एक ना अनेक गोष्टी दरवर्षी दिसून येत होत्या. मार्च २०२० पासून करोनाचा प्रादुर्भाव झाला आणि नेहमीचे उत्सवी वातावरण एकदम सुतकी वातावरणात बदलून गेले. घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले. रस्त्यावरील वावर कमी झाला. गर्दी टाळण्याचे शासकीय आदेश देण्यात आले. त्यामुळे जागोजागी शुकशुकाट जाणवू लागला. आजूबाजूला करोना रुग्णांची तसेच करोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या वाढू लागल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. सगळं जनजीवनच ठप्प झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत उत्सव साजरा करणे शक्यच नव्हते आणि तशी कोणाची मानसिकताही राहिलेली नव्हती.

गुढीपाढव्यापासून राज्य शासनाने करोनाचे जवळपास सर्वच निर्बंध मागे घेतले. गर्दी होणाऱ्या ज्या-ज्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली होती, ती उठवण्यात आली. त्यात गावोगावच्या यात्रांचा समावेश होता. निर्बंधमु्क्त होताच गावांमधील उत्सव कमिटय़ांमध्ये उत्साह संचारला. यंदा उत्सव जोरात करायचा, या भावनेतून सगळे तयारीला लागले. बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचा आखाडा, लोकनाटय़ तमाशा अशा पद्धतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील बदललेले चित्र ठळकपणे दिसून येत आहे. तळेगावच्या यात्रेपासून यात्रांचा हंगाम सुरू झाला, त्यापाठोपाठ एकेक करत आजूबाजूच्या गावांच्या यात्रा सुरू झाल्या. वाकड-हिंजवडीची बगाड यात्रा पंचक्रोशीत सर्वात प्रसिद्ध आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा प्रचंड उत्साह होता. हजारोंची गर्दी झाली होती. हीच परिस्थिती आजूबाजूच्या गावांमध्ये होती. भोसरीतील यात्रा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. प्रचंड उत्साहाबरोबरच गावकीच्या राजकारणाचा प्रत्यय भोसरीत आला.

पिंपरी-चिंचवड परिसराचे शहरीकरण झाले असले तरी अजूनही ग्रामीण संस्कृतीचा बाज टिकून आहे. यात्रा, जत्रा, सण, समारंभातून तो दिसून येतो. जत्रा, उरुस हा ग्रामीण संस्कृतीमधील कुळाचार आणि आनंदोत्सव आहे. यात्रेत खेळण्याच्या दुकानापासून मनोरंजक कार्यक्रमांपर्यंत तर पारंपारिक वाजंत्र्यांपासून कुस्ती आखाडय़ापर्यंत सर्वाचा समावेश असतो. करोना काळात सर्वकाही बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांवर त्याचा परिणाम झाला होता. आता पुन्हा नव्या जोमाने त्यांचे व्यवसाय सुरू झाल्याने गावगाडय़ाच्या अर्थकारणाला गती मिळू लागली आहे.




 

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.