Skip to main content

जुन्नरमध्ये सोसायटीच्या निवडणुका रंगवतायत ‘भाऊबंदकी’ तील राजकारणाचा पारा

जुन्नर प्रतिनिधी:

जुन्नर तालुक्यात सहकार सोसायटीच्या निवडणुकीने ग्रामीण राजकारण ढवळून निघाले आहे गावागावात गटातटाच्या राजकारणाने भाऊबंदकी राजकारणाचा पारा चढला असुन जिल्हा परीषद आणी पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्याने आता नजरा गट -गणाच्या आरक्षणाकडे आहेत.यामुळे गाव यात्रामधेही आता राजकीय पुढारी हजेरी लावुन निवडणूक आल्याची चाहुल देऊ लागले आहेत. गावपातळीवर आर्थिक कणा मानल्या गेलेल्या सोसायटीच्या माध्यमातून शेतीपिकासाठी कर्ज दिले जाते.ग्रामपंचायतीच्या आणी सोसायट्याच्या निवडणुका महत्वाच्या असतात.यामुळे सर्व राजकीय पक्षांनी या सोसायटीच्या निवडणुकीकडे जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

 प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात

कोरोनामुळे सुमारे एकदीड वर्ष या सोसायट्याच्या निवडणूक रेगांळल्या होत्या पर्यायाने त्यांना मुदतवाढ मिळाली होती. आता सर्वच तालुक्यातील सोसायट्याच्या निवडणुका जाहीर झाल्या असून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

स्थानिक राजकीय समीकरणे अवलंबून

सोसायटीची निवडणूक म्हणजे गावाची मिनी विधानसभा च असते. सोसायटीमधून एकजण जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान करतो.त्या प्रतिनिधीला विशेष महत्त्व असते.त्यामुळेच सर्वच पक्षीय राजकीय पुढारी आपापल्या समर्थकांना आपले नशीब आजमावत सांगत असतो व आपली राजकीय ताकद निर्माण करत असतो.याच निवडणुकावर बहुतांश स्थानिक राजकीय समीकरणे अवलंबून असताना दिसुन येतात .हे मात्र तितकेच खरे आहे. ग्रामीण भागात या सोसायटीच्या निवडणुकाना सुरुवात झाल्याने गावपातळीवर मात्र राजकीय वातावरण व भावकीचे वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघाले आहे .हे तितकेच खरे आहे.

 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.