Skip to main content

एकाच दिवशी शिक्षक-शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या, तालुक्यात एकच खळबळ

बीड प्रतिनिधी :

गेल्या 24 तासांत शिक्षक आणि शेतकऱ्यासह तिघा जणांनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुका अक्षरशः हादरून गेला आहे. शिक्षक सुरेश बडे, शेतकरी रामचंद्र गरुड आणि कृष्णा कोके या तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली. या तिघांनीही गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. नैराश्यातून शिक्षकाने जीव दिल्याचं समोर आलं आहे. तर व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेतला. तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नाही.

शिक्षकाचा घरात गळफास

पहिली घटना, शहरालगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प येथे घडली. सुरेश रामकिसन बडे (वय 37, रा. गावंदरा ता. धारूर) हे शिक्षक तिथे राहत होते. त्यांनी नैराश्यातून गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. घरातील लोखंडी आडयाला गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली. ही घटना सकाळी त्यांचे चुलते सुभाष श्रीरंग बढे यांच्या निदर्शनास आली. त्यांच्या माहितीवरुन माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाचा बेल्टने गळफास

दुसरी घटना, राजेवाडी येथे कृष्णा बालासाहेब कोके (वय 19 वर्षा) या युवकाने आत्महत्या केली. बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कमरेला असलेल्या बेल्टच्या सहाय्याने त्याने राहत्या घरी गळफास घेतला. मात्र कृष्णाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी दिंद्रुड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

शेतकऱ्याची लिंबाच्या झाडाला लटकून आत्महत्या

तिसरी घटना, राजेगाव येथील रामचंद्र धुराजी गरड (वय 40 ) या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून त्यांनी आयुष्याची अखेर केली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत आत्महत्येच्या तीन घटना घडल्याने माजलगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.