Skip to main content

महाराष्ट्रातील घाटात ट्रकचालकाचा कुणी केला खून? 24 तासांच्या आत पोलिसांनी लावला शोध!

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:


पंजाबमधून स्पिरीट भरुन गोव्याकडे निघालेल्या ट्रकचालकाचा महाराष्ट्रातील फोंडा  घाटात खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना चोवीस तासांच्या आतच दिल्लीतून अटक केली आहे. फोंडा घाटात नियोजनबद्धरीत्या ट्रक चालकाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. शनिवारी ट्रकच्या केबीनमध्ये पुरुषाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी पोस्टमॉर्टेम केल्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचं उघड झालं होतं. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव तरलोकसिंग धरमसिंग असल्याचं समोर आलं होतं. वय वर्ष 54 असलेल्या तरलोकसिंह हे पंजाबमधून गोव्याच्या दिशेनं ट्रक घेऊन चालले होते. पण वाटेतच त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी हत्या झाल्याचं कळताच विशेष पथक नेमून 24 तासांच्या आत दोघांना बेड्या ठोकल्यात.

का करण्यात आली हत्या?

ट्रक चालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. यातील संशयित आरोपी कमलजीत हा पाच वर्षांपासून मृत धरमसिंहच्या ओळखीचा होता. अधनंमधनं तो त्याच्यासोबत प्रवास करत असे. दरम्यान, दोघांमध्ये पैशांवरुन वाद झाला होता. धरमसिंग यांच्याकडे असलेल्यी वीस हजार रुपये रोख रक्कम लुटण्याच्या हेतूनं त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला. तर लोखंडी रॉडनं हत्या केल्यानंतर त्यांच्याकडील 20 हजार रुपयांची रोकड घेऊन दोघांनी पलायन केलं होतं.

कसा लागला आरोपींचा शोध?

पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावंही समोर आली आहेत. यापैकी कमलिजत सिंग हा 53 वर्षांचा असून बलविंदर हा 25 वर्षांचा आहे. या दोघांनी क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे. ट्रक आला कुठून? त्याचा मार्ग काय होता? तसंच ट्रकमधील कागदपत्रांच्या आधारं पोलिसांनी आरोपींची शोध घेण्यास सुरुवात केली. तसंच सीसीटीव्ही फुटेचच्या मदतीनं पोलिसांनी आपली शोध मोहीम सुरु केली होती. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच पोलिसांनी या हत्येप्रकरणी चोवीस तासांच्या आत आरोपींना गजाआड केलंय.

आरोपील रेल्वेनं दिल्लीली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी विमानानं दिल्ली गाठली आणि रेल्वे स्टेशनवरच दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. सापळा रचून पोलिसांनी महाराष्ट्रात पंजाबमधील ट्रक चालकाची हत्या करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  

पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.