मोरगाव प्रतिनिधी:
मोरगाव (ता . बारामती) येथील तीन महाविद्यालयीन युवतींचा अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला . यामध्ये ऋतुजा दिपक तावरे (वय वर्षे 19) हिचा जागीच मृत्यू तर दुचाकीवरील रुपाली अरुण कौले व अंकीता विष्णु तावरे या गंभीर जखमी झाल्या असुन या तीघीही सुपा येथील विद्या प्रतीष्ठानमध्ये शिकत आहेत.
बारामती तालुक्यातील विद्या प्रतीष्ठानच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्गात ऋतुजा दीपक तावरे , अंकीता विष्णू तावरे , व रुपाली अरुण कौले या शिकत आहेत . आज दि .29 रोजी महाविद्यालय सुट्टीनंतर आपल्या दुचाकीवरुन सुप्यावरुन मोरगावला येथे येत होत्या . दरम्यान सुपा-मोरगाव या रस्त्यावरील राजबाग पाटी नजीक दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान आल्या असता अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
यामध्ये मोरगाव नजीक शेराचीवस्ती येथील ऋतूजा दिपक तावरे या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर अंकीता विष्णु तावरे , रुपाली अरुण कौले या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना मोरगाव येथे खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.