Skip to main content

हातावरील टॅटूवरून शोधला अल्पवयीन मुलीच्या बाळाचा बाप

बारामती : प्रतिनिधी 



अल्पवयीन मुलीला फुस लावत तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी युवकावर बलात्कार आणि पॉस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल त्याला अटक केली आहे. या आरोपी युवकाला पोलिसांनी नाव माहित नसताना त्याच्या हाताच्या ‘टॅटू’वरुन शोध घेत अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईसमवेत ससून रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी गेली होती. मुलगी बारामतीची असल्याने शहर पोलीसांनी याबाबत तेथील पोलीसांनी माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहचत पीडित मुलीचा व तिच्या आईचा जबाब नोंदवला.

मोरगाव रस्त्याकडे एका शाळेत जात असताना तिची एका मुलाबरोबर ओळख झाली. दोन-तीन वेळा तो तिला रस्त्यातच भेटला. त्याने तिला फूस लावले. त्यातून त्यांचे निरा डावा कालव्यालगत काहीवेळा शारीरिक संबंध आले. त्यातून ती गरोदर राहिली. समाजात व बारामतीत चर्चा होईल म्हणून आईने मुलीला ‘ससून’मध्ये नेले. पोलिसांनी मुलीकडे आरोपीबद्दल चौकशी केली. मात्र, त्याच्या हातावर बदाम व हातावर सागर असे गोंदलेले आहे. या व्यतिरिक्त कोणतीही माहिती पीडित मुलीने व तिच्या आईकडे नव्हती. मुलीने दिलेल्या वर्णनावरून गोपनीय पध्दतीने पोलीसांनी तपास सुरू केला.

या तपासात सलीम उर्फ सागर इक्बाल मुश्रीफ (वय २५, धंदा क्लिनर, रा. गोजुबावी, ता. बारामती, मूळ रा. लक्ष्मीनारायण नगर, बारामती शहर ) असे त्या युवकाची नाव असल्याची माहिती पुढे आली. ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्या हातावर टॅटूचे वर्णन देखील मिळून आले. भा.द.वि. कलम ३७६ व पॉस्को कायद्याप्रमाणेच्या गुन्ह्यांमध्ये तात्काळ अटक केली. या प्रक़रणी आरोपीसह, अल्पवयीन मुलगी आणि गर्भाची ‘डीएनए’ तपासणी करण्यासाठी रासायनिक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत.

प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सदर गुन्हा उघड करण्यासाठी आदेश दिले होते. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे तुषार चव्हाण, मनोज पवार, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, बंडू कोठे, यांनी तपास करून कौशल्याने उघड केलेला आहे. पीडित मुलीकडून कोणतेही नाव माहीत नसताना केवळ हातावरील टॅटूवरुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

बत्तीस वर्षीय महिला चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता

समर्थ भारत वृत्तसेवा: विजय कानसकर पारगाव  कारखाना.( ता आंबेगाव ) मुळ रा रोकडेतांडा ता चाळिसगाव जि जळगाव, येथील बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.  पारगाव कारखाना येथील राहते झोपडीतून सुरेखा सुरेश जाधव बत्तीस वर्षीय विवाहित महिला चार वर्षीय मुलगी सलोनी सुरेश जाधव या चिमकुलीसह कोणाला काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. आजूबाजूच्या परिसरामध्ये व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु ती कोठेच आढळून आली नाहीं. या प्रकरणी महिलेचा पती सुरेश मोरसिंग जाधव यांनी आपली पत्नी व मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.