Skip to main content

मुलींच्या वस्तीगृहासाठी ९ कोटी ७० लाख रुपयांचा निधी - आ. निलेश लंके

 पारनेर - प्रतिनिधी:



पारनेर तालुक्यातील पळशी येथील आदिवासी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील मुलींच्या वस्तीगृहाच्या कामासाठी ९ कोटी ७० लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांना या निधीबाबत २६ ऑक्टोबर २०२० रोजी लेखी पत्र देऊन या निधीची मागणी केली होती. त्यानुसार पळशी येथील शासकीय आश्रमशाळा, पळशी येथील पायाभुत सुविधा अंतर्गत या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. या शासकीय आश्रमशाळेत आदिवासी ठाकर भील्ल बंजारा धनगर या समाजातील मुला मुलींचे शिक्षण घेण्याचे मोठे प्रमाण आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा ही योजना राबविली जाते. माझ्या पारनेर-नगर मतदार संघातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पळशी ता. पारनेर, जि. अहमदनगर या शाळेत १ ली ते १० वी पर्यंतचे वर्ग असुन एकूण मंजुर विद्यार्थी क्षमता ५०० (४०० निवासी आणि १०० वाहिस्थ ) एवढी आहे. या शाळेच्या आस्थापनेवर वर्ग-३ सावर्गाची १५ आणि वर्ग ४ संवर्गाची १८ अशी एकूण ३३ पदे मंजुर आहेत. आश्रमशाळेकडे पुरेशा प्रमाणत ( सुमारे ७ एकर) स्वमालकीची जागा उपलब्ध आहे. सदर आश्रमशाळेतील पायाभुत सुविधा अंतर्गत खालील महत्वाची कामे गरजेचे असून यासाठी निधी मिळावा अशी लेखी मागणी पण आमदार लंके यांनी केली होती.यामध्ये प्रामुख्याने शालेय इमारत दुसरा टप्पा बांधकाम: शालेय इमारतीच्या पहिल्या टप्याचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. परंतु अजूनही ३ वर्गासाठी वर्गखोल्या नसल्याने सदर वर्ग तात्पुरत्या शेड्समध्ये भरविण्यात येतात. तरी शालेय इमारतीच्या दुसऱ्या टप्याच्या बांधकाम अंतर्गत ३ वर्ग खोल्यांचे बांधकाम होणे गरजेच आहे. मुले व मुलींचे वसतिगृह सध्यस्थितीत आश्रमशाळेच्या जुन्या शेड्स मध्ये मुलांच्या निवासाची व्यवस्था करण्यात •आली असुन मुलींच्या निवासाची व्यवस्था शालेय इमारतीत करण्यात आलेली आहे. विद्यार्थी सुविधा व सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचेसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. तरी या आश्रम शाळेतील मुले व मुलींसाठी नवीन टाईप प्लॅननुसार स्वतंत्र वसतिगृह इमारतीचे बांधकाम होणे गरजेचे आहे.कर्मचारी निवासस्थाने आश्रमशाळेच्या कॅम्पमध्ये ४ कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम करण्यात आलेले असुन सदर निवासस्थानात ४ कर्मचारी राहतात. उर्वरीत कर्मचान्यांसाठी आश्रमशाळेच्या कॅम्पसमध्ये निवासाची सुविधा नाही. सर्व कर्मचा-यांना आश्रमशाळा कॅम्पसमध्ये राहणे शक्य व्हावे यासाठी पुरेशा कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम होणे गरजेच आहे. तरी वर नमूद केलेले कामे झाल्यास माझ्या मतदार संघातील आदिवासी मुलांचे प्रश्न सुटतील ते चांगल्यापद्धतीने शिक्षण घेवू शकतील तरी सदर कामांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशा विविध मागण्या आमदार निलेश लंके यांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मुलींचे वस्तीगृहा साठी हा निधी मिळाला असून लवकरच या ठिकाणी अद्ययावत वस्तीगृहाची इमारत उभी राहणार आहे.

 आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एवढा मोठा निधी सरपंच राहुल झावरे अप्पा शिंदे

पळशी येथील शासकीय आश्रम शाळेत खडकवाडी पळशी वनकुटे नागपुर वाडी काळू ढवळपुरी  व राहुरी तालुक्यातील आदिवासी समाजातील मुले व मुली शिक्षण घेत असून चांगली वस्तीगृहाची सोय नसल्याने अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे आमदार निलेश लंके यांनी आदिवासी विभागाकडे सातत्याने यासंबंधी पाठपुरावा करून पहिल्या टप्प्यात मुलींच्या वसतिगृहासाठी ९ कोटी ७०  लाख रुपयांचा निधी मंजूर करून या मुला-मुलींना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एवढा मोठा निधी दिला असल्याची माहिती सरपंच राहुल झावरे व उपसरपंच  अप्पासाहेब शिंदे यांनी दिली आहे.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...