Skip to main content

मंचर नगरपंचायतीची निवडणूक होईपर्यंत प्रशासकपदी मच्छिंद्र घोलप यांची नियुक्ती

प्रतिनिधी : मंचर 

नगरविकास विभागाने मंचर नगरपंचायतीची रितसर रचना होईपर्यंत नगरपंचायतीचे अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी जुन्नर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिद्र घोलप यांची प्रशासक म्हणून सोमवारी (दि. २९) नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक २५ रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंचर नगरपंचायतसंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली होती.

मंचर नगरपंचायतीसंदर्भात २३ डिसेंबर २०२० रोजी हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्या कालावधीत एकही हरकत जिल्हाधिकारी पुणे यांना प्राप्त न झाल्याने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मंचर नगरपंचायत गठित करण्यात आली आहे. नगरपंचायत निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीबरोबर अथवा जुलैमध्ये लागू शकते. तोपर्यंत मंचर नगरपंचायतीचा कारभार जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी पाहणार आहेत, मंचर नगरपंचायतीत साधारणतः सतरा सदस्य असण्याची शक्यता आहे.अशी असेल मंचर नगरपंचायतीची हद्द. 

अनुसूची 'अ'

संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र. मंचर सर्व्हे नं. १ ते १७३, सर्व्हे नं. १७७, गावठाण खुद्द १७४ ते १८१, मोरडेवाडी सर्व्हे नं. १ ते ८१, गावठाण सिटी सर्व्हे नं. १ ते ९९८ 

अनुसूची 'ब'

संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील उत्तर एकलहरे शिव, उत्तर पूर्व - घोडनदी, चांडोली बुद्रुक, पूर्व - चांडोली खुर्द, दक्षिण पूर्व अवसरी खुर्द शिव, दक्षिण - शेवाळवाडी, दक्षिण पश्चिम निघोटवाडी शिव, पश्चिम निघोटवाडी शिव पश्चिम उत्तर सुलतानपूर शिव.



पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.