Skip to main content

पुणे जिल्ह्यातील गावातला कोरोना होतोय हद्दपार; हॉटस्पॉट गावांची संख्याही घटली

पुणे प्रतिनिधी:

जगात एकीकडे ओमिक्रॉन नामक कोरोनाचा नव्या विषाणू धुमाकूळ घालत आहे. या भीतीमुळे पुन्हा लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी एकेकाळी जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला विषाणू आता हळूहळू हद्दपार होत आहे. या आठवड्यात हॉटस्पॉट गावांची संख्या पुन्हा घटली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ गावांत १० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. हे चित्र दिलासादायक असले तरी विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे आता पुन्हा सतर्क राहावे लागणार आहे.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाने उच्चांक गाठला होता. दुसऱ्या लाटेत मे महिन्यापासून मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली गेली. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने दवाखान्यात खाटासुद्धा मिळणे कठीण झाले होते. त्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने चिंतेत आणखी भर पडली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने यानंतर प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर प्राधान्याने भर दिल्याने कोरोना बाधित आटोक्यात आले.

जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने राबविल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले. असे असले तरी ग्रामीण भागात १०पेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या हॉटस्पॉट गावांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. १०० च्या वर या गावांचा आकडा होता. या गावात प्राधान्याने रुग्णसंख्या कमी करण्यासाठी धडक सर्वेक्षण मोहीम प्रशासनाने आखली. घरोघरी जाऊन संशयितांची तपासणी करण्यात आली. यात अनेक बाधित आढळल्याने त्यांना योग्य उपचार वेळीच मिळाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले.

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ८ गावांत १० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या आठवड्यात ११ गावे ही हॉटस्पॉट होती. आंबेगाव तालुक्यात १, हवेली तालुक्यात ४, शिरुर तालुक्यात २, तर दौंड तालुक्यात १ अशा ८ गावात १०पेक्षा जास्त रुग्ण आहेत.

सर्वात जास्त क्रियाशील रुग्ण असलेल्या हॉटस्पॉट ग्रामपंचायती

जिल्ह्यात ८ गावांत सर्वाधिक क्रियाशील रुग्ण आहेत. यात वाघोलीत ३८, मांजरी बुद्रुक २४, निमोणे १९, मांडवगण फराटा १८, नऱ्हे १८, वरवंड १४, नांदेड १३, मंचर १२.

७ लाख ३३ हजार ७०७ जणांची नमुना तपासणी

जिल्ह्यात हॉटस्पॉट गावात रुग्णसंख्या आटाेक्यात आणण्यासाठी धडक सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत नमुना तपासणी करण्यात आली. त्यानुसार ७ लाख ३३ हजार ७०७ जणांची रुग्णतपासणी करण्यात आली.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...