Skip to main content

महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य - उपसभापती निलमताई गोऱ्हे

पुणे प्रतिनिधी:






पुणे दि. 29 : राज्य शासन महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब आहे. महिलांवरील अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर वाचक ठेवणे आवश्यक आहे. महिला सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन, महिला दक्षता समिती तसेच महिलांच्या प्रश्नासंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक संघटना यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह येथे महिला सुरक्षेबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.





गोऱ्हे म्हणाल्या, साक्षीदार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. महिलांना होणाऱ्या त्रासबाबत त्वरित माहिती मिळावी यासाठी सीसीटीव्ही संख्या वाढविणे, गस्त वाढविणे, वारंवार घटना घडणाऱ्या ठिकाणी पथदिव्यांची सोय करणे गरजेचे आहे. महिला सुरक्षिततेच्यादृष्टीने याबाबतची प्रभावी अंमलबजावणी  आवश्यक आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत प्रलंबित केसेस तात्काळ निकाली काढण्याच्यादृष्टीने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधी व न्याय विभागाच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नाबाबत आपण मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगून श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवास करताला महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी यंत्रणा सतर्क ठेवावी. रेल्वे पोलीस, राज्य पोलीस दल यांना सीसीटीव्ही संख्या वाढविणे व ऑनलाईन देखरेख कार्यक्षम करून गुन्हे जागीच रोखणे, महिलांच्या तक्रारी लवकर समज़ुन माहिती होण्यास व्हाट्सअप ग्रुप करणे, तसेच सामाजिक संघटनांचा पोलीसांच्या तपासात, पिडीतांच्या समुपदेशनात सहभाग वाढविण्याबाबत  सूचनाही त्यांनी दिल्या.  भरोसा सेल सक्षमीकरण, महिलासाठी स्व मदत गटांची स्थापना, महिलांचे समुपदेश, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल वेळेत यावेत यासाठी सबंधित यंत्रणेने विशेष प्रयत्न करावे असे  त्यांनी सांगितले.

यावेळी यावेळी पोलीस आयुक्त गुप्ता,  पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,  सहपोलीस आयुक्त डॉ.  शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी आपल्या क्षेत्रातील महिला सुरक्षेच्यादृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली.




पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

सहाय्यक फौजदाराची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या..

मंचर प्रतिनिधी: मंचर पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले एकनाथ ठकाजी वाजे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्याघटना केल्याची खळबळजनक बुधवार दिनांक .२५ मे २०२२ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत त्यांचे जावई आदित्य रवींद्र गभाले(वय.२५ वर्षे) रा.मुक्ताई नगर नारायणगाव,ता.जुन्नर,जि.पुणे यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की,फिर्यादी यांची पत्नी दिनांक.२३ मे २०२२ रोजी माहेरी चांडोली,ता.खेड येथे आई-वडिलांकडे गेल्या होत्या.दिनांक.२५ मे रोजी फिर्यादीची पत्नी सुप्रिया हिने तिचा पती यास फोन करून वडील एकनाथ वाजे यांनी शेजारी असणाऱ्या मोकळ्या १३ नंबर रूममध्ये स्वतःला कोंडून घेतले असून आम्ही बराच वेळ दरवाजा वाजूनही ते दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले.त्यानंतर कुटुंबियांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुटुंबियांनी रूमचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता एकनाथ वाजे यांनी बेडरूममधील हुकाला रस्सी बांधून गळफास घेतल्याचे दिसले.एकनाथ वाजे यांचा गळफास सोडून त्यांना खाली घेऊन ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून ते उप...

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...