Skip to main content

संजय जगतापांना साध्या गोष्टीसाठी सुद्धा इतरांचे उंबरे झिजवावे लागताहेत

पुरंदर प्रतिनिधी:







पुरंदर तालुक्यातील बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटातील गावागावांत आपण अवघ्या १९ टक्के रकमेतून शेतकऱ्यांना पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी दिले. त्यामुळे अवघ्या काही वर्षांपूर्वी ओसाड असलेल्या या भागात आज हजारो एकर ऊस पाहायला मिळतोय.
गावे सुधारली, तरीदेखील या भागातून आपल्याला समाधानकारक मतदान झाले नाही. आज मात्र संपूर्ण पुरंदर तालुका पश्चात्ताप व्यक्त करीत आहे. साध्या साध्या गोष्टीलासुद्धा आपल्या लोकप्रतिनिधीला इतरांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. हा त्रास आपणच स्वतःला करवून घेतला आहे, अशी खंत माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केली.

पिसर्वे (ता. पुरंदर) येथील कार्यक्रमात माजी मंत्री शिवतारे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, युवा सेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, सासवड शहरप्रमुख अभिजित जगताप, उमेश गायकवाड, रमेश इंगळे, माणिक निंबाळकर, गणेश मुळीक, सागर मोकाशी, सरपंच बाळासाहेब कोलते, रवींद्र कोलते, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मी भगवा हाती घेतला, तेव्हा पुरंदर तालुक्यातील साधा ग्रामपंचायत सदस्यसुद्धा माझ्यासोबत नव्हता. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे दिग्गज नेत्यांची फौज होती. राजकारणात काडीचंही स्थान नसलेल्या सामान्य पोरांनी शिवसेनेला घराघरांत पोचवलं आणि २००९ ला तालुक्यात भगवा फडकवला, असे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या शिवसेनेतील राजकीय प्रवासाबाबत सांगितले.
ज्यांना समाजकार्याची आवड आहे

त्यांनी पुढे यावे, अशा इच्छुकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विजय शिवतारे यांनी करून नवीन युवकांना शिवसेना, युवासेना, विद्यार्थीसेना अशा संघटनांमध्ये, व महिलांना महिला आघाडी आणि युवती सेनेमध्ये विविध पदांवर सामावून घेणार असल्याचे शिवतारे यांनी जाहीर केले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.




पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...