Skip to main content

तांबडेमळा येथून जाणाऱ्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचा विरोध

निरगुडसर प्रतिनिधी:





आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथून जाणाऱ्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी बाधित शेतकऱ्यांनी शेतीची मोजणी करून देण्यास अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला आहे. हा विरोध करण्यासाठी सर्व शेतकरी एकत्र आले होते.
पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी आमच्या बागायती जमिनीचे भूसंपादन न करता वनक्षेत्राच्या पडीक / माळरान जमिनीचे भूसंपादन करावे अशी शेतकऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे मागणी केली. 

या रेल्वे प्रकल्पामध्ये तांबडेमळा गावातून रेल्वे प्रकल्प नेल्यास आमच्या बागायती जमिनीचे क्षेत्र जात आहे. आम्ही आमच्या जमिनी गावाच्या ओढ्यावर बंधारे, डिंभे उजवा तीर कालवा यामधून स्वखर्चाने पाईप लाईन करून पाणी आणून आमचे क्षेत्र बागायती केले आहेत. या शेती व्यवसायावरच आमच्या कुटुंबाचा उदर्निवाह होतो. आम्ही अल्प भूधारक शेतकरी आहोत ,सरकारने रेल्वे प्रकल्पासाठी आमच्या शेतीवर हातोडा घालून आमच्यावर अन्याय करू नये. विकासासाठी रेल्वे प्रकल्प महत्वाचा आहे परंतु त्यासाठी आमच्या जमिनीचे भूसंपादन न करता गावाच्या शेजारी असलेल्या वन विभागाच्या पडीक क्षेत्रातून भूसंपादन करावे अशी मागणी यावेळी बाधित शेतकऱ्यांनी केली.

या बाबत तांबडेमळा ग्रामपंचायतच्या विशेष ग्रामसभेत पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वेला ग्रामस्थांनी एकमताने विरोध करत ठराव मंजूर केला आहे.या ग्रामसभेत सरपंच ज्ञानेश्वर भोर यांनी आभार मानले त्या प्रसंगी उपसरपंच धनश्री तांबडे, पोलीस पाटील सोनाली ताबडे, तंटामुक्ती अध्यक्ष गौरव भोर, शिवाजी तांबडे, माजी मुख्यध्यापक नथुराम तांबडे, दत्ता तांबडे, विश्वास भोर, माजी सैनिक गंगाराम भोर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आदी उपस्थित होते.




पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.