Skip to main content

दोन गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडी मिळालेल्या बांदलवर आता हवेलीतही गुन्हा दाखल

केसनंद प्रतिनिधी:






हवेली तालुक्यात एका शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन परस्पर ६ कोटी ७५ लाख रुपये काढून घेत बोजा कमी करण्यासाठी पून्हा एक कोटी मागितल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल व साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे व विकास भोंडवे यास अटक केली आहे.

गुन्हा दाखल केलेल्यामध्ये संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी आदींचा समावेश आहे. याप्रकरणी गंगाराम सावळा मासाळकर (वय ७४, रा. वढु खुर्द, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी : सन २०१३ मध्ये फिर्यादी गंगाराम सावळा मासाळकर यांच्या मालकीच्या मौजे वढू खुर्द, (ता. हवेली, जि. पुणे) येथील गट क्र. १५३/१ मध्ये ३ हेक्टर ७१ आर या जमिनीचे गहाणखत आपसात संगनमताने करण्यासाठी मंगलदास बांदल, संदिप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे व शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी यांनी फिर्यादीला त्यांच्या चारचाकी मोटारीमध्ये डांबून ठेवून दमदाटी करून व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जबरदस्तीने करून एकूण सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये परस्पर काढून घेतले. तसेच जमीनीवरील बोझा कमी करण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयाची मागणी केली.

संबंधित व्यक्तींचे राजकीय लागेबांधे असल्याने त्याच्याविरोधात तक्रार दिल्यास कुटुंबियांना त्रास देतील म्हणून फिर्यादीने आतापर्यंत तक्रार दिलेली नव्हती. परंतु अदयापपर्यंत जमीनीवरील बोझा कमी केला नाही, म्हणून फिर्यादीने त्यांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे व विकास भोंडवे यास अटक केली आहे. अधिक तपास पुणे शहर गुन्हे शाखेच्या यूनिट सहाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील हे करीत आहेत.

दरम्यान, शिरूर तालुक्यामध्ये शिक्रापूरात दत्तात्रेय मांढरे यांच्या अशाच फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात बांदलसह इतरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडी मिळालेल्या बांदलवर आता हवेलीतही गुन्हा दाखल झाल्याने बांदलसह इतर साथीदारांच्या अडचणीतही वाढ झाली आहे.

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...