Skip to main content

डॉक्टर, पोलीस, आरोग्य सेविका, सफाई कर्मचारी आणि??? कोरोना योद्ध्यांच्या यादीत शिक्षकाचा विसर...

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:





मार्चपासून कोरोणा महामारीमुळे संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये आहे. स्वप्नातही कुणी विचार केला नाही, असे संकट जगासमोर ओढवले. अशा काळात संपूर्ण जग घरात असताना डॉक्टर, पोलीस, आरोग्य सेविका, सफाई कर्मचारी या चार घटकांनी दिवस-रात्र मेहनत घेतली, परंतु सर्वेक्षण, भरारी पथक, नियंत्रक अधिकारी, टोलनाक्यावरील ड्युटी, पेट्रोल पंपावरील ड्युटी, समुपदेशन आशा अनेक ड्युट्या करूनही कोरोणा योद्ध्यांच्या यादीतला समाजातील पाचवा घटक, शिक्षक हा मात्र कोरोणा योद्ध्याच्या यादीतून उपेक्षितच राहिला आहे.

मार्चपासून शाळा बंद आहेत पण शिक्षण बंद नाही.शिक्षक काय करत आहे असा प्रश्न निश्चितच समाजातील प्रत्येकाला पडत होता, परंतु आशा महामारीच्याच्या काळात शिक्षक गुगल मीटिंग, झूम मीटिंग, व्हाट्सअप ग्रुप या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवून त्याने शिक्षण प्रक्रिया कुठेच खंडित केली नाही. कोरोना काळातही तो विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहिला.एवढेच नव्हे तर सर्वेक्षण, भरारी पथक, नियंत्रक अधिकारी, टोलनाक्यावरील ड्युटी, पेट्रोल पंपावरील ड्युटी, समुपदेशन आशा अनेक कामांच्या माध्यमातून त्यांनी देशाला राष्ट्रीय कामात मदत केली. कोरोना योद्ध्यांच्या यादीत नाव असो अगर नसो पण त्यांने आपले काम प्रामाणिकपणे पार पाडले आणि राष्ट्रीय कामात हातभार लावला.

कोरोना काळातील आपली ड्युटी पार पाडत असताना अनेक शिक्षक कोरणा बाधित झाले तर काही त्यात दगावलेही.काही अपघाताचेही शिकार झाले परंतु या जागतिक महामारीच्या संकटात शिक्षिक कुठेही कमी पडले नाहीत किंवा मागे हटलेही नाहीत. त्यांनी या संकटाचा अत्यंत धैर्याने मुकाबला केला.कधी आरोग्य विभागाशी निगडित नसलेल्या शिक्षकांने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी खांद्याला खांदा लावून काम केले.

आज या शिक्षकाला कोरोणा योद्ध्या म्हणून पुरस्कार मिळावा,अशी अपेक्षा नाही किंवा चार घटकांच्या यादीत आपले नाव द्यावे, अशीही अशा नाही. परंतु समाजाने या पाचव्या घटकाचा सन्मान ठेवावा,हीच माफक अपेक्षा आहे.कारण कोरोणा काळात यांनीही इतरांप्रमाणे राष्ट्रीय कामात खारीचा वाटा उचलला आहे.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...