Skip to main content

हातात कोयता घेऊन ठेवलेलं स्टेट्स आलं अंगाशी, तरुणाची तुरुंगात रवानगी

पुणे प्रतिनिधी:









चंदन नगर येथील १९ वर्षीय युवकाला सोशल मिडीयावर हातात कोयता घेऊन ठेवेलेले स्टेटस चांगलेच महागात पडले आहे. संभाव्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चंदन नगर च्या आंबेडकर नगर मधील अनिकेत साठे या १९ वर्षीय युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अनिकेत साठे हा नेहमी कोयता आणि तत्सम हत्यारे हातात घेऊन सोशल मिडीयावर आपले फोटो स्टेट्स म्हणू ठेवतो, परिसरात दहशत निर्माण करतो आणि त्याचे वर्तनही संशयास्पद आहे. अशी माहिती पुणे गुन्हे शाखा चार च्या पथकाला मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे व सहाय्यक फौजदार गणेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजस शेख, दीपक भुजबळ, पोलीस नाईक कौस्तुभ जाधव, सुरेश साबळे, स्वप्नील कांबळे आणि सुरेंद्र साबळे यांनी सापळा रचून संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे. संबंधित युवकाकडून एक लोखंडी कोयता जप्त केला असून त्याचेवर शस्त्र अधिनियम १९५९ आणि तत्सम कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत.


अलीकडे समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे अनेक तरुण मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यातच शहरांमध्ये रायझिंग गंग्स चे मोठे पेव फुटले असून अनेक तरुण याकडे आकर्षित होऊन असे वेडे धाडस करत आहेत, त्यासाठी मुलांचे, त्यांच्या पालकांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांच्या संगोपनाकडे लक्ष द्यावे असे मत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले. 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.